भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांचे विविध ठिकाणी विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांचे विविध ठिकाणी विनम्र अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : कार्याने त्यांच्या झाला लाखोंचा उद्धार,त्यांच्या लेखणीनेच सिद्ध झाले मानवाचे अधिकार !करोडो दलित, शोषित आणि वंचितांना समता व समानतेचा अधिकार मिळवून देणारे, भारतीय संविधानाचे निर्माते, युगनायक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विनम्र अभिवादन केले. यामध्ये सैनिक कॉलनी येथे यशोदा महिला मंडळाच्या वतीने तसेच समता नगर, सिद्धार्थ नगर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अहमदपूर येथे आमदार बाबासाहेब पाटिल अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच सर्वांना भीम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच अरुण वाघंबर यांच्या संकल्पनेतून कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या स्मरणार्थ अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटिल यांनी उपस्थित राहून गरजूंना अन्नदान केले. प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते धर्मपाल गायकवाड, सौ.विजयाताई गायकवाड, सांब अण्णा महाजन, राज्य रिपाई सचिव बाबासाहेब कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, माजी सभापती चंद्रकांत मदे, ता. अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि प सदस्य माधव जाधव, काँग्रेस ता.अध्यक्ष ऍड हेमंतराव पाटील, सय्यद इलियास भाई, अमितजी रेड्डी, बालाजी वाडीकर, अफरोज शेख, डॉ. ओ एल किनगावकर, एल किनगावकर, माजी जि प सदस्य देवानंद मुळे, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, नगरसेवक अभय मिरकले, रवी महाजन, नगरसेवक भैय्याभाई, गोपीनाथ जोंधळे, दयानंद पाटील, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष मुन्ना कांबळे, प्रकाश ससाणे, सतीश नवटके, अशोक सोनकांबळे, जंगापले, हुसेन मणियार फेरोज शेख, नबी सय्यद , मेजर पाशाभाई, माजी नगरसेवक दस्तगिर भाई शेख, हुसेन मणियार, संदीप शिंदे, किरण बारमाळे, अशिष तोगरे, उत्तमराव गुळवे तसेच समाज बांधव पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते.

About The Author