डॉ. बाबासाहेब आंबेडकर लाखात एक नव्हे तर जगात एक – प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांचे प्रतिपादन
सिकंदराबाद (गोविंद काळे) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जगाचं भूषण आहे. म्हणूनच ते लाखात एक नव्हे तर जगात एक होते…! असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. वसंत बिरादार हे सिकंदराबाद पासून वीस कि. मी. अंतरावर असलेल्या असिफाबाद येथील नवयुथ डॉ.बाबासाहेब आंबेडकर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३१व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते विशेष मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सतीश ससाणे होते. पुढे डॉ. बिरादार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी अनेक वर्षांपासून जातीचे विषारी पीक डौलाने डोलत होते. ते मुळासकट नष्ट करून सामान्यातील सामान्यांना जगण्याचा स्वाभिमानी बाणा प्रदान केला असे म्हणून डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनातील अनेक हृदयस्पर्शी घटना प्रसंग हिंदी भाषेतून नमूद नमूद करून असिफाबाद मधील नागरिकांचे प्रबोधन व उद्बोधन केले.
या प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतीश ससाणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे युगपुरुष होते. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व संविधानातून हे मूल्य देऊन भारतीयांना माणूस म्हणून जीवन जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना जगात संबोधले जाते. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा आणि वारसा पुढे युवकांनी अंगिकारून चालवल्यास भारत महासत्ता निश्चितच होईल असेही ठामपणे म्हटले. डॉ.ससाणे यांनी या प्रसंगी इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषेतून मार्गदर्शन केले. यावेळी या भाजपाचे महापौर कुमार बिर्ला, अकबर सैफ,संदीप रेड्डी, नगरसेवक जयेश कुमार , अशोक तलारिया, ईश्वर कुमार, जयश्री आय्यर, पंचशीला कुमार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची कार्यक्रमाची पंचशील घेऊन डॉ.बाबासाहेबाचा जयघोष करीत भीमसैनिकांनी आसमंत दणाणून सोडला. सूत्रसंचलन शरद कुमार यांनी केले तर आभार भीमसेन यांनी मानले . यावेळी बहुसंख्य नागरिक,महिला, तरूणांची उपस्थिती होती.