डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी – गणेश हाके

डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी - गणेश हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला. माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा एकमेव तारा बाबासाहेब होता. असे मत गणेश हाके यांनी सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा येथे आयोजित जयंती कार्यक्रमात बोलताना मांडले. यावेळी संचालक कुलदीप हाके, संचालिका शिवालीका हाके, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे आय टी आय चे प्राचार्य मदन आरदवाड,वैजनाथ धुळगुंडे, सिद्धू मासोळे, रवी नारवटे,सतीश केंद्रे,मंगेश पोले, संतोष होनमाणे आदी उपस्थित होते.

About The Author