डॉ शरद तेलगाणे डॉक्टर संघटनेकडून सन्मानित
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील निमा या वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या तज्ञांच्या संघटनेकडून अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त आयोजित कार्यक्रमात उदगीर येथील ख्यातनाम डॉक्टर तथा प्रबोधनकार, प्रवचनकार शरद कुमार तेलगाणे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ शरद तेलगान हे सतत सामाजिक जाणीवा जपत समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात. कोरोना काळात त्यांनी फार मोठी जबाबदारी स्वीकारून प्रबोधन करत असताना, कोरोणा रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्य केले आहे. तसेच त्यांनी समाजसेवा ही मोठ्या प्रमाणात केली आहे. आपण या समाजाचे काही देणे लागतो. ही भावना ठेवून ते सतत सामाजिक उपक्रम राबवत असतात.
या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून निमा संघटनेने आपले अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने डॉक्टर शरद तेलगान यांचा सत्कार करून गौरव केला आहे. या कार्यक्रमासाठी निमा संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सोनटक्के, निमा एम एस बी चे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल शर्मा, लातूर निमाचे कोराळे, मोटेगावकर, संजय सांडोळकर, डॉ राजकुमार घोनसीकर, प्रवीण देशमुख, उदय गुजलवार यांच्या हस्ते शरद कुमार तेलगाने यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
त्यांना गौरव पत्रही देण्यात आले. याप्रसंगी डॉ धनाजी कुमठेकर, जगदीश मद्येवाड, रवी पाटील ,बालाजी काटेवार, कालिदास बिरादार ,सुनील बनशेळकीकर, नारायण जाधव, सादिक पटेल यांच्यासह उदगीर ,देवणी ,जळकोट तालुक्यातील बहुसंख्य निमा सदस्य उपस्थित होते.