राचन्नावाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात भागवत कथेमध्ये श्रिकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

राचन्नावाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहात भागवत कथेमध्ये श्रिकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

चाकूर (गोविंद काळे) : तालुक्यातील राचन्नावाडी येथे दि.०९ एप्रिल रोजी पासून अखंड शिवनाम सप्ताहा व श्रिमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहा मध्ये दररोज दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत श्रिमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.भागवत कथाकार हं.भ.प.काशिनाथ महाराज नागदरवाडीकर यांच्या अमृत वाणीतून भागवत कथा सुरू आहे.यावेळी आज दि.१३ एप्रिल रोजी श्रिमद भागवत कथेमध्ये श्रिकृष्ण जन्मोत्सवाची कथा सांगण्यात आली.यावेळी भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, राधा, गौळणी आदीचे पात्र साकारण्यात आले होते.यावेळी पांडुरंग बालाजी वागलगावे यांच्या चार महिन्यांचा श्रिनिवास मुलाने भगवान श्रीकृष्ण यांचे पात्र साकारले होते. तर वासुदेव यांच्या भुमीकेत देवानंद वागलगावे हे होते. ज्यावेळी श्रिकृष्ण, वासुदेव, राधा, गौळणी भागवत कथेमध्ये यांचे आगमन झाले तेंव्हा सर्व भाविक यांना पाहतच राहिले. यामुळे राचन्नावाडी नगरीत साक्षात भगवान श्रीकृष्ण, वासुदेव आवतरले काय असे आनंदी वातावरण झाले होते. हि संपुर्ण वेशभुषा नरसिंग सिताराम वागलगावे व भुजंग चिंचोळे यांनी केली होती. यावेळी गावातील विविध मुलिंनी राधा व गौळणीचे पात्र साकारले होते. यानंतर श्रिकृष्ण जन्मोत्सव साजरा करून भगवान श्रीकृष्ण यांचा पाळणा घालण्यात आला. त्यामुळे राचन्नावाडी येथील भाविक मंत्रमुग्ध होऊन भगवान श्रीकृष्ण, राधा, गौळणी, श्रिकृष्णाचा पाळणा पाहून लोक भारावून गेले होते. यावेळी राचन्नावाडीसह परिसरातील भाविक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

About The Author