भाजपा ने काहीही गमावले नाही…शिवसेनेने मात्र मतदारसंघ गमावला
कोल्हापूर पोट निवडणूक! भाजपने काहीही गमावलेल नाही. मागील 30 वर्षात भाजपने फक्त 2014 ला निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत 40, 000 मते भाजप ला मिळालेली. मागील 30 वर्षात ती सीट 3 वेळा सेनेकडे राहिली होती. आणि 2 वेळा कोंग्रेस. भाजपला वोट शेअर तिन्ही पक्षा पेक्षा जास्त आहे. भाजपची संघटन बांधणी नव्हती, कारण आजपर्यंत भाजपने निवडणूक लढवली नव्हती कारण सेने सोबत युतीमुळे सीट सेनेकडे असायची. त्यामुळं ही सीट सेनेचा बालेकिल्ला होता. या निवडणुकीने भाजपला स्वतःचा मतदार मिळाला. भाजपला 78 हजारांच्या जवळपास मते मिळाली आहेत. तर तिन्ही पक्षाच्या उमेदवाराला 96 हजारांच्या आसपास मिळाली आहेत. 2019 ला कोंग्रेस उमेदवाराला 91 हजार होती ती फक्त 5 – 6 हजारांच्या फरकाने वाढले आहेत, तिन्ही पक्ष एकत्र असताना. 2014 ला भाजपला 40 हजार मते होती ती तब्बल 38 हजाराने वाढली आहेत. भाजपची 38 हजार वाढलेली मते ही शिवसेनेची जे हिंदुत्ववादी विचारधारा जोपासणारे आहेत. अस समजायला हरकत नाही. ती आजपर्यंत सेनेला मिळत होती. मग आता सेना तर नाही, आणि सेनेचा उमेदवारही नाही. मग हार झाली कुणाची? शिवसेनेनं मतदारसंघ गमावला, शिवसेनेनं मतदार गमावला. हार ही शिवसेनेची झाली. निवडणुकीत जय पराजय होतं असतो. भाजप पराजयाच्या क्षितिजातून विजयाचा सूर्योदय शोधणारा पक्ष भाजपा आहे. 2024 ला नक्कीच हा मतदारसंघ भाजपचा असेल. – प्रकाश गाडे