डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संत ज्ञानेश्वर विद्यालयात विनम्र अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संत ज्ञानेश्वर विद्यालयात विनम्र अभिवादन

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विश्वरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक आशा रोडगे, उद्धव शृंगारे यांच्या हस्ते करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक आशाताई रोडगे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण केले.त्यांचा आदर्श उराशी ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये मोठे व्हावे असे आवाहन केले. यावेळी पहिली ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांच्या भाषण, काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. प्रारंभी संविधान पत्रिकेचे वाचन पुष्पलता भालेराव, संस्कृती मलशेट्टे, अपूर्वा देशमुख व ज्ञानेश्वरी सूर्यवंशी यांनी केले. एकूण 72 विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व श्री वर्धमान महावीर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे भाषणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी सूत्रसंचालन सतीश साबणे,वरद मुंढे, स्वराज मोरे यांनी केले तर आभार नंदकुमार मद्देवाड यांनी मानले. यासमयी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author