माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा बँकेत १२१ जणांनी केले रक्तदान
आ.धीरज देशमुख यांच्या हस्ते रक्तदान, पानपोई चा शानदार शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँक कर्मचारी संघटना व गटसचिव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात तब्बल १२१ जणांनी रक्तदान केले विशेष म्हणजे यात महीला कर्मचारी यांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता दरम्यान बँकेच्या वतीने सोमवारी पाणपोई चा शुभारंभ बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या दोन्ही सामाजिक उपक्रमास बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत बाजुळगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोई ज शेख, संचालक मंडळ उपस्थित होते.
बँकेची रक्तदानाची अविरत सेवा अभिमानास्पद
यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख यांनी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २० वर्षापासून रक्तदान शिबिर घेत आहेत यामुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो असे नावीन्य उपक्रम निश्चित समाजाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करून बँकेच्या कर्मचारी अधिकारी यांचे कौतुक केले.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक माजी उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अशोक गोविंदपुरकर, अँड राजकुमार पाटील, मारोती पांडे,अनुप शेळके, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, तज्ञ संचालक सुनिल कोचेटा, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, नारायणराव लोखंडे, उदयसिंह देशमुख, विजयकुमार पाटील, उपस्थित होते.
यावेळी माऊली ब्लड बँकेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने उन्हाळा सुरू असल्याचे सावलीची ऊब मिळावी यासाठी साहेबांचे चित्र असलेल्या कॅप चे मोफत वितरण आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी माऊली ब्लड बँकेचे डॉ उमाकांत जाधव, डॉ जितेन जैस्वाल, उपस्थित होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी सदस्य सहदेव मस्के, सचिन दाताळ, बँकेचे सरव्यवस्थापक सी एन उगिले, सरव्यवस्थापक तानाजी जाधव, बँकेचे माध्यम समन्वयक हारिराम कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गटसचिव संघटणा, बँक कर्मचारी संघटना, अधिकारी कर्मचारी, तसेच माऊली ब्लड बँकेचे डॉ उमाकांत जाधव, डॉ हितेन जैस्वाल, डॉ अर्फान टाके, डॉ धर्मेंद्र ठाकूर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनिल पाटील यांनी केले.