जिद्द व अपार मेहनतीच्या कसोटीवर इच्छा स्वप्नपूर्ती परिपूर्ण केली

जिद्द व अपार मेहनतीच्या कसोटीवर इच्छा स्वप्नपूर्ती परिपूर्ण केली

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिकुल परिस्थिती वर मात करून समाजातील इतरांना आर्दश ठेवनारे अनेक मंडळी या समजात असतात तसेच कार्य आणि कर्तव्य सातत्याने इतरांना प्रेरणादायी असते असेच यश अहमदपुर तालुक्यातील छोटेसे गाव चिखली येथील सुपुत्र विधिज्ञ रवी शिवाजीराव इरले यांनी मिळवले आहे .आत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुबंई सारख्या धावपळीच्या वातावरणात घर व प्रपंच संभाळून धावत्या लोकल प्रवासात सातत्याने अभ्यासावर लक्ष देऊन न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यथ मिळवले.

विधिज्ञ रवी इरले यांची न्यायाधीश पदासाठी निवड झाली त्यामुळे अहमदपुर तालुक्यात सर्वत्र अभिमानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आसताना विधिज्ञ रवी इरले यांनीं संकटांना तोंड देत.त्यांच्यावर मात करत जिध्दिने आपले शिक्षण पुर्ण केले.त्यांची अभ्यासुव्रती ,जिद्द , चिकाटी, मेहनत व वरिष्ठांचे मार्गदर्शनामुळे विधिज्ञ इरले यांनी घवघवीत गुण मिळवून न्यायाधीश परिक्षेत उत्तीर्ण झाले ही परीक्षा १ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. तरी या पदासाठी मुख्य परीक्षा २५ स्पटेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. तर यासाठी १४ ते २४ मार्च २०२२ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे मा.न्यायाधीश यांचे समक्ष २२७ उमेवारांची मुलाखत घेण्यात आली होती त्यात विधिज्ञ रवि इरले यांनी सर्व प्रकिया यशस्वीरित्या पुर्ण केल्या व न्यायाधीश पदासाठी त्यांची निवड झाली. त्यांच्या या स्वपन्पुर्ती मध्ये त्यांचे जेष्ठ विधिज्ञ सहकारी बंधु- वकील मित्र, आई – वडील, ताई व भाऊजी, काका- काकु, भाऊ- वहिनी, अक्का – भाऊजी यांचै अनमोल सहकार्य मिळाले असे रवि इरले यांनी बोलतांना सांगीतले. विधिज्ञ रवि इरले यांचे प्राथमिक शिक्षण माहात्मा फुले विघ्यालय अहमदपुर येथे तसेच माध्यमिक शिक्षण व विधी शिक्षण उदगीर येथील संत तुकाराम विधी महाविद्यालयात आपले शिक्षण पुर्ण केले त्यानंतर एल. एल. एम साठी मुबंई युनीव्हरसिटी येथे प्रवेश मिळवला तेथुनच त्यानीं मा. विधिज्ञ जावेद आख्तरखान सर व वरिष्ठ विधिज्ञ प्रिती शहा यांच्या ऑफिस मध्ये अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकीलीचे कामकाज सूरु केले. अहमदपुर तालुक्यातील जेष्ठ विधिज्ञ कै.शिवाजीराव बाबुराव इरले यांचे स्वप्न त्यांचे सुपुत्र विधिज्ञ रवी शिवाजीराव इरले यांनी जिद्द व अपार मेहनतीच्या कसोटीवर इच्छा स्वप्नपूर्ती परिपूर्ण साकार केली .

About The Author