डॉ.कलाम यांचे जीवन खूप संघर्षमय होते – कुलदीप हाके

डॉ.कलाम यांचे जीवन खूप संघर्षमय होते - कुलदीप हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रुद्धा ता. अमदपुर येथे विद्यार्थी मार्गदर्शन व विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिराचे उद्घाटन संचालक कुलदीप हाके संचालिका शिवलिका हाके यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे तांत्रिक रोबोट शिक्षकांच्या मदतीने बनवण्यात आली. यावेळी बोलताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारचे गुण दडलेले असतात त्यांच्या क्षमतेनुसार घडविण्याचे काम हे शिक्षकांचे असते यामधील काही विद्यार्थी अब्दुल कलाम सारखे वैज्ञानिक होऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला. तुमची स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी तुम्हाला स्वप्न पाहावे लागेल अब्दुल कलाम यांच्या जहाजावरील अफाट इच्छेमुळे त्याला वैमानिक अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले गरीब कुटुंबातील असूनही त्यांनी कधी अभ्यास थांबवला नाही त्यांच्या या अफाट परिश्रमामुळे ते संपूर्ण भारतामध्ये ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ लागले असे मत कुलदीप हाके म्हणाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय श्री शुभम पोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कानवटे यांनी केले तर आभार प्राचार्य सौ ऋत चक्रनारायण यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी सूर्यवंशी, वैजनाथ धुळगुंडे, तसेच आनंत उदगिरे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author