माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते राम जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी रामनवमी च्या निमित्ताने अहमदपूर शहरात रामजन्मोउत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.सदरील राम जन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार रायगड मित्र परिवाराच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर जातीय सलोखा राखत हजारो रामभक्ताच्यां उपस्थितीत अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य दिव्य विराट अशी श्रीरामाच्या प्रतिमेची शोभा यात्रा काढण्यात आली होती. अहमदपूर शहरात सदरील रामजन्मोत्सव भुतोन भविष्यती असा साजरा केल्या बद्दल संयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार येथील संत चुडामणी मंदिरात माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करून रामभक्त तरुणांनाचा उत्साहा वाढविण्याचे काम रायगड मित्र परिवाराच्या पुढाकाराने करण्यात आला.
यावेळी सेवा निवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणिकर , जुगलकिशोर शर्मा, श्रीकांत भूतड़ा, नरहरि शिंदे, भरत शिरूरकर,अशोक हालसे, नरहरी माळी, बापूराव शिरूरकर, गोविंदराव गिरी, डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, मकरंद जोशी, जयभाऊ भूतड़ा,राजू कंधारकर, विनोद भूतडा, अँड.किशोर कोरे, गणेश हालसे, यशवंत देशमुख, अँड. निखिल कासनाळे, कमलाकर सांगविकर, पप्पू सांगविकर,सूरज भूतड़ा, हरीश नाईकवाडे, प्रमोद शिंदे,बाळासाहेब गंगापुरे, सुदर्शन हालसे, सुभाष हालसे, दीपक हालसे यांच्या सह रायगड मित्र परिवार सदस्य व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.