माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस लातूर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष च्या वतीने लातूर येथे दि. 19 एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांचा वाढदिवस लातूर जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अनावश्यक खर्च टाळत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रासपाचे लातूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब करपे यांच्या वतीने शहरातील मातोश्री वृद्धाश्रम याठिकाणी फळे वाटप करण्यात आले तसेच मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम बांधवांकडून माजी मंत्री महादेव जानकर यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी रासपाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, लातूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब करपे, बालाजी लवरे, जय राऊत, धनाजी भंडारी, खंडेराव मुळे, गजानन माने, आदित्य कर्पे, दत्ता कळबंडे, संजय पवार, हर्षदीप मोरे, सचिन गीते, गणेश स्वामी, दीपक भाऊ, रोहित पाटील, नितीन झोले आदी रासपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!