सोसायटीच्या माध्यमातून चांगले कार्य करावे – आ.धीरज देशमुख

सोसायटीच्या माध्यमातून चांगले कार्य करावे - आ.धीरज देशमुख

आ.धिरज देशमुख यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील रामेगाव, चिंचोली (ब ) येथील नवनिर्वाचित सोसायटी संचालकांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरु असून अनेक सोसायटी बिनविरोध निवडून आल्या आहेत तर काही ठिकाणी निवडणुका पार पडल्या आहेत निवडूण आलेल्या नूतन सोसायटी संचालक मंडळ व पॅनल प्रमुख यांचा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील रामेगाव व चिंचोली (ब.) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पॅनल प्रमुख यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला यावेळी सोसायटीच्या माध्यमातून अधिक चांगले काम करावे, यासाठी त्यांनी आमदार धीरज देशमुख यांनी शुभेछा दिल्या.

सोसायटीच्या माध्यमातून चांगले कार्य करावे - आ.धीरज देशमुख

लातूर तालुक्यातील रामेगाव येथील सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री रामलिंगेश्वर शेतकरी शेतमजूर विकास पॅनलचा विजय झाल्याबद्दल जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते पॅनल प्रमुख धनंजय देशमुख, गोविंद मधुकर मगर, सचिन नागुलकर, विजयी उमेदवार भगीरथ देशमुख, भास्कर मगर, पवन मगर, भाऊसाहेब मगर, वैभव मगर, अनंत मगर, मारोती मगर, भालचंद्र मगर, कमल नागुलकर, विमल मगर, लक्ष्मीबाई आदमाने, वैजनाथ सूर्यवंशी, बाबुराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच लातूर तालुक्यातील चिंचोली (ब.) येथील सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री काळभैरव विकास पॅनलचा विजय झाला. त्याबद्दल बँकेचे चेअरमन आ. धिरज देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवार जगन्नाथ कावळे, सुभाष जाधव, रामभाऊ टकले, सुधीर नवले, अण्णासाहेब नागापुरे, नानासाहेब नांदे, हरिश्चंद्र पवार, रमाकांत बनाळे, शामलबाई कणसे, चंपाबाई कावळे, ज्ञानोबा चौधरी, नारायण माळी यांच्यासह पॅनल प्रमुख विजयमूर्ती शेटे, अनिल पाटील, बाळासाहेब चव्हाण, बालाजी सुरवसे, विजयकुमार नवले, सोमनाथ लवटे, रामकिशन वाघमारे, प्रल्हाद माळी, उमाकांत बनाळे, मधुकर जोगदंड, अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राम मगर, भारत मगर, विश्वनाथ बिडवे, काकासाहेब मगर, श्रीहरी मगर, पांडुरंग मगर, श्रीराम आदमाने, चंद्रशेखर मगर, हनुमंत नागुलकर, बालासाहेब केशव बिडवे, बाबासाहेब रंगनाथ मगर, मधुकर पिसाळ, सुनील बिडवे, महादेव रामराव मगर आदी उपस्थित होते.

About The Author