दयानंद ॲनीमेशनच्या विद्यार्थ्यांची कॉसमॉस माया कंपनीत निवड
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद कला महाविद्यालयातील बी.ए. ॲनीमेशन या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील अक्षय पोतदार, मनत गटागट व नचिकेत साळुंके या तीन विद्यार्थ्यांची पदवीची अंतिम परीक्षा पुर्ण होण्याअगोदरच ॲनीमेशन क्षेत्रातील कॉसमॉस माया इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीत थ्रीडी ॲनीमेटर या पदावर निवड झाली. त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष आरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्तसचिव सुरेश जैन व कोषाध्यक्ष संजय बोरा यांनी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉ. सुनील साळुंके, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, ॲनीमेशन विभागप्रमुख प्रा. दूर्गा शर्मा व विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
दयानंद कला महाविद्यालयामध्ये इ.स.2009 पासून बी.ए. ॲनीमेशन ॲण्ड वेब डिझाईन हा पदवी अभ्यासक्रम सुरु असून आजतागायत अनेक विद्यार्थी ॲनीमेशन क्षेत्रातील विविध नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये मोठया पदावर कार्यरत आहेत. ॲनीमेशन पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात अमर्याद नोकरीच्या संधी उपलब्ध असलेला कौशल्य अधारीत पदवी अभ्यासक्रम असून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले भवितव्य उज्वल करावे. असे प्रतिपादन या सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.