जिल्हा बँकेच्या वतीने शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार – आ. धीरज देशमुख
रेणा साखर कारखान्याच्या वतीने आमदार धीरज देशमुख यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात अग्रगण्य असलेल्या जिल्हा बँकांत अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदी रेणा साखर कारखान्याचे संचालक व लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची निवड झाल्याने त्यांचा रेणा साखर कारखाना येथे संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच बँकेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झालेले अँड प्रमोद जाधव, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते पुढे बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की लातूर जिल्हा बँक ही नावाजलेली अग्रगण्य संस्था असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शना खाली अनेक चांगले निर्णय घेवुन बँकेने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वेळोवेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारे निर्णय घेउन विक्रम प्रस्थापित केले आहे सहकार महर्षी माननीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी इथ मला जे काम करण्याची संधी दिली ती सार्थ ठरवत आगामी काळात शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली.
यावेळी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, रेणा साखर चे कार्यकारी संचालक बी व्हि मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमास रेणा साखर कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, प्रवीण पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, संग्राम माटेकर,
प्रेमनाथ आकनगिरे, संजय हरिदास,संभाजी रेड्डी, शहाजी हाके, तानाजी कांबळे, लालासाहेब चव्हान, अनिल कु टवाड, पंडितराव माने, स्नेहल देशमुख, सचिव रविशंकर बरमदे, एस एस भोसले, एस आर मोरे, एस एम उरगुंडे, डी बी देशमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.