प्रेम लागी जीवा या चित्रपटाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते प्रमोशन
लातूर (प्रतिनिधी) : दि. 21 एप्रिल रोजी दयानंद कला महाविद्यालयात प्रेम लागी जीवा या चित्रपटाचे प्रमोशन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांच्या हस्ते प्रमोशन करून मराठवाड्यातील तरूण कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करून देत आहेत. असे गौरवउदगार काढले व सर्वांनी हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन आवश्य पहावा असे आवाहन करून त्यांना शु्भेच्या दिल्या.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सदरील चित्रपटात तांबड्या मातीची गुलाबी प्रेमकहाणी चित्रीत करण्यात आली आहे. ती आपण आवश्य पहावे. असे प्रतिपादन केले. हा चित्रपट दि. 22.04.2022 रोजी संबंध महाराष्ट्रातल्या चित्रपट गृहात प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराची भुमिका अभिनेत्री वैशाली साबळे व दिग्दर्शक व कलाकार सोमनाथ लोहार यांनी साकारलेली आहे. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता खांडेकर आणि नागेश थोंटे यांनी केली आहे.
तसेच या चित्रपटात दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थी रवीराज सगर यांनी सहाय्यक दिग्दर्शक व कलाकार म्हणून भुमिका बजावलेली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत हर्षद पठाडे, श्री. खराडे, तुकाराम शिंदे, गणेश भालेराव, मयुरी नव्हाते, राजश्री अहिरे, जॉनी रावत यांनी अथक परीश्रम घेतले आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशन प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. प्रदिप सुर्यवंशी, डॉ. सुनिता सांगोले, डॉ. गोपाल बाहेती अधिक्षक नवनाथ भालेराव यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.