शहरातील पाणीगळती कडे लक्ष देतं का कोणी लक्ष

शहरातील पाणीगळती कडे लक्ष देतं का कोणी लक्ष

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर (काँग्रेस +भाजपा) आरोप प्रत्यारोपण करून झाले असतील तर खोरी गल्ली रमा बिग सिमेनाच्या बाजूला, हॉटेल साईप्रसाद च्या उजव्या बाजूला गेली कित्येक वर्षे पाणी गळती मोठ्याप्रमाणात होत आहे. याबाबत वारंवार तक्रार केली असता थातुर-मातुर जलवाहिन्यांची दुरुस्ती केवळ प्रसिद्धीसाठी केली जाते. परिणामी लातूरकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे व कित्येक वर्षांपासून हजारो लिटर पाणी गळती होऊन वाया जात आहे. केवळ समाजमाध्यमांवर आम्ही कटिबद्ध आहोत. काँग्रेस व भाजप सत्ताधाऱ्यांमुळेच नागरिकांवर विनाकारण दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे असे पेपर मध्ये छापून आणत मोठी संवंग प्रसिद्धी मिळवली आहे. जर यातून थोडी जरी सवड मिळाली असेल तर सत्ताधारी व विरोधकांनी लातूर शहरातील पाणीगळती कडे लक्ष देतं का कोणी लक्ष असा टोला लातूर शहर राष्ट्रवादीने लगावला आहे.

About The Author