लातूर बाजार समितीच्‍या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार

लातूर बाजार समितीच्‍या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार

औसा (प्रतिनिधी) : नुकत्‍याच झालेल्‍या महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघाच्या निवडणूक निकालामध्‍ये शिवसेनेचे लातुर जिल्‍हयांचे माजी जिल्‍हाप्रमुख संतोष सोमवंशी यांची निवड झाल्याने लातूर कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, च्‍या बैठकीत सत्‍कार करण्‍यात आला.संतोष सोमवंशी यांनी औसा बाजार समितीचे प्रतिनिधीत्‍व करत महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघाची निवडणूक लढून निवडणूक जिंकुन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघावर उपसभापती म्‍हणुन निवड करण्‍यात आली त्यांचा लातूर कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती च्‍या सर्व संचालक मंडळाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला व त्‍यांना पुढील कार्यासाठी शुभेच्‍छा देण्‍यात आल्‍या.यावेळी सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, सचिव भगवान दुधाटे, संचालक विक्रम काका शिंदे, संभाजी वायाळ, बाळूशेट बिदादा, सुधीर गोजमगुंडे, सहसचिव सतीश भोसले, भास्कर शिंदे, नंदकुमार गायकवाड, अरविंद पाटील सह सर्व संचालक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!