काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची गरज – पालकमंत्री अमित देशमुख
माजी सभापती भानुदास सोलंकर यांच्या निवासस्थानी दिली भेट, उपस्थितांशी साधला संवाद
लातूर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाला त्याग, बलिदान आणि सेवाभावाची परंपरा आहे, कोरोना महामारीच्या काळात त्याचा प्रत्यय जनतेला आला आहे. असे नमूद करून काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची गरज असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगीतले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील एमआयडीसी रोड परिसरातील सोलंकर नगर येथील माजी सभापती भानुदास सोलंकर यांच्या निवासस्थानी भेट दिली, उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्या सोडविण्यासाठी संबंधीताना त्यांनी सूचना केल्या या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पूढे बोलतांना ते म्हणाले, उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात जे ठराव झाले आहेत त्यावर लातुरात कॉंग्रेस पक्षाने चर्चासत्र आयोजित करावे. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती दिनापासून जनसंपर्क अभियानाची सुरुवात करावी, लातूर शहर आणि जिल्ह्यात जे काही चांगले घडले आहे ते सर्व काँग्रेस पक्षानेच केले आहे. यापुढेही काँग्रेस पक्षच जनतेच्या हिताच्या योजना राबवू शकतो हे जनतेला पटवून द्यावे आणि आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही कार्यकर्त्यांना याप्रसंगी पालकमंत्री ना. देशमुख यांनी केले.
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. किरण जाधव लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, लातूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पवन सोलंकर, बबन देशमुख, नगरसेवक विकास वाघमारे, विजयकुमार साबदे, लातूर शहर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष हकीम शेख, बंडू किसवे, प्रा.प्रवीण कांबळे, नगरसेवक आसिफ बागवान, कैलास कांबळे, महेश काळे, पंडीत कावळे, प्रा.संजय जगताप, दीपक सोलंकर, बंडू सोलंकर, व्यंकटराव सोलंकर, दताप्पा सोलंकर, अभिषेक पतंगे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते सोलंकर कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.