दयानंद कला महाविद्यालयात डी.ए.सी.एल. गीताच्या पोस्टरचे प्रकाशन
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय आजपर्यंत अनेक कलावंत घडले अनेक उच्चपदस्थ अधिकारी झाले असो या दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रती कृतज्ञता म्हणून विजय मस्के या माजी विद्यार्थ्यां कलावंताने,
“घडलो इथेच, धडपडलो इथेच
धन्य तुझे उपकार, आम्ही कलाकार
डी. ए. सी. एल. आमची शाखा कला”
या गीताचे लेखन करून ध्वनिमुद्रित केले आहे. याचे संगीत दिग्दर्शन व गायन विजय मस्के यांनी केले आहे या गीताचे ध्वनिमुद्रण व्ही ट्युन्स चे विनायक राठोड व निलेश पाठक यांनी केले आहे.
विजय मस्के यांनी आत्तापर्यंत कलर्स मराठी वरील बाळू मामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत भूमिका निभावली आहे. तसेच झोंबिवली या चित्रपटात भूमिका केली आहे.तसेच सोनी मराठी वाहिनी वरील गाथा नवनाथाची या मालिकेत सुद्धा भूमिका केली आहे.दयानंद कला महाविद्यालयाचे हे टायटल साँग केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या गीताच्या पोस्टरचे प्रकाशन दयानंद कला महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात गुलबर्गा येथील सुप्रसिद्ध उर्दू शायर अब्दुल हक उस्ताद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, सौ. जयमाला गायकवाड,विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. सुनील साळुंके, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, डॉ. बालाजी घुटे, डॉ संदीपान जगदाळे, डॉ.अशोक वाघमारे , कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते.