गोविंद केंद्रे यांनी जिल्ह्यात भाजपला दिशा दिली – दिलीपराव देशमुख मालक
अहमदपूर (एल.पी. उगिले) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला मजबूत करून संघटन उभा केले. असे विचार भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख मालक यांनी व्यक्त केले. माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा यथोचित सत्कार करून गौरव केला. याप्रसंगी ते बोलत होते.
पुर्वी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व नव्हते, मात्र माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर विजय मिळवला, जिल्हाभरात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले. नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, नाहीतर जिल्हा परिषद असेल! प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. असा आत्मविश्वास बाळगून नव्या पिढीला सोबत घेऊन मोठ्या जिद्दीने त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम केले. आजही त्याच उमेदीने आणि त्याच जिद्दीने ते भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत, हे उल्लेखनीय आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या नंतरही दोन वेळा उदगीरला विधानसभा मतदार संघावर भारतीय जनता पक्षाला वर्चस्व निर्माण करता आले. उदगीरची नगरपरिषदेची निवडणूक सहज जिंकता आली, पंचायत समितीवरही भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवला. इतकेच नाही तर उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हटले तर नवल नाही. असे उद्गार दिलीपराव देशमुख मालक यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या सत्कार समारंभाच्या प्रसंगी उदगीर येथील भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव फुलारी भालके यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अमदपुर तालुका उपाध्यक्ष दत्ता गोरे, जब्बार पठाण, द्वारकादास नाईक, उत्तम केंद्रे, श्रीकांत देशमुख इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.