निसर्ग सृष्टी म्हणजेच भगवंताचा प्रसाद होय
वीरमठ संस्थांचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : सर्व विश्वामध्ये भगवंताचे रूप एकच असून सर्व निसर्ग सृष्टी मध्ये तो चराचरात व्यापला असल्याचे सांगून निसर्ग सृष्टी म्हणजेच भगवंताचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन वीर संस्थांचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले. दि.17 रोजी वैशाखी पौर्णिमा निमित्त भक्ती स्थळ येथे आयोजित राष्ट्रसंत परम पूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पालखी उत्सव सोहळ्यात आचार्य गुरुराज स्वामी आशीर्वचन पर बोलत होते. यावेळी मंगल पिठावर वीर मठ संस्थान निलंगा चे संगण बसव स्वामी सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आचार्य गुरुराज स्वामी पुढे बोलताना म्हणाले की सद्यस्थितीला वेगवेगळ्या वातावरणातील प्रदूषणामुळे व व्हायरस मुळे प्रथ्वी सह धरतीमाता संपूर्णपणे संकटात सापडले असून सदरचे संकट दूर करण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडे लावा निसर्ग वाचवा अध्यात्मिक सुखासाठी मानवी सत्संगाचा सर्व मानवजातीने अंगीकार करावा असे जाहीर आवाहन केले. यावेळी संगण बसव स्वामी यांचेही मार्गदर्शन पर आशीर्वचन झाले .या पंचमी महोत्सवात विविध गावांचे सदर भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या महोत्सवात भक्ती स्थळाच्या सचिव सुप्रियाताई घोटे ,ओमप्रकाश पुणे, शिवकुमार उटगे ,रामलिंग तत्तापुरे, राजकुमार कल्याणी, विनोद हिंगणे ,सतीश लोहारे, शीलाताई शेटकार, शिवलिंग पाटील किनीकर, संजय ऊस्तुरगे, संतोष चवले, शिवकुमार गंजगाले, महिला सह सदभक्त मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या महोत्सवाचा समारोप मंगनाळी ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित सर्व भक्तांना रस पोळीच्या महाप्रसादाने करण्यात आला.