लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप चा मोठ्या उत्साहात समारोप
उदगीर (एल. पी. उगिले) : गेल्या 15 तारखेपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियन स्पर्धांचा उदगीरकरानी पुरेपूर आनंद घेतला. सदरील स्पर्धेचे नियोजन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय राजेश्वर निटुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 45 संघाने सहभाग नोंदवला होता. मोठ्या उत्साहात आणि जिद्दीने खेळाडूंनी क्रीडा रसिकांची मने जिंकली.
एका बाजूला आयपीएल चालू असतांना देखील उदगीरच्या क्रीडा रसिकांनी जिल्हा परिषद मैदानावर तोबा गर्दी केली होती. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेली दोन वर्ष कोणत्याही स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या प्रमाणात संपन्न झाल्या नाहीत, विशेषत: मैदानी स्पर्धा तर झाल्याच नाहीत. त्यामुळे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचे मोठे आकर्षण उदगीरकरांना निर्माण झाले होते. या स्पर्धांमुळे खेळाडूंना नवचैतन्य आणि नवीन ऊर्जा मिळालेली दिसून आली. या स्पर्धेसाठी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांना देखील आनंद देऊन गेला. या स्पर्धेचा अंतिम सामना निडेबन टीम विरुद्ध नक्शा टीम असा अत्यंत चुरशीचा सामना झाला. या सामन्यात नक्शा टीम उदगीर ने आठ खेळाडू राखून विजय मिळवला. विजयी टीमला लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप समितीच्यावतीने रोख रक्कम 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच द्वितीय आलेल्या संघाला एकतीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून अबू पठाण यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहन येनाडले त्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर मालिकावीर म्हणून रुपेश तुकडे यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम आलेल्या टीमची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याणराव पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय भैय्या निटूरे, उदगीर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मंजूर खाॅंन पठाण, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, शिक्षक काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बालिका मुळे, शहर काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा ललिता झील्ले, माजी नगर परिषद सदस्य व्यंकट बोईनवाड, रेखाताई कानमंदे, शिवाजीराव वखवाले, प्राध्यापक गोविंद राव भालेराव, प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे, संदीप पाटील, दत्ता सुरणार, संजय काळे, संतोष वळसने, श्रीनिवास एकुर्केकर, नागेश पटवारी, सद्दाम बागवान, बिपिन जाधव, आशिष चंदेले, प्रकाश गायकवाड, फैयाज डांगे, आदर्श पिंपरे, शिवाजी पकोळे, प्रशांत पाटील, ईश्वर समगे, शेख जावेद, दत्ता सगर, अजय कबाडे ,राहुल सातापुरे, बंटी कसबे, राहुल सुतार, सागर राठोड, नासिर शेख यांच्यासोबतच युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.