अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कारांची घोषणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केली आहे.
सदरील पुरस्कारासाठी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आदी राज्यांतून आलेल्या सुमारे दोनशे प्रवेशिकांतून परीक्षकांनी दिलेल्या अंतिम निकालानुसार खालील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
प्रथम पुरस्कार लासलगाव जि. नाशिक येथील प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ‘ अस्वस्थतेची डायरी ‘ या ग्रंथाला जाहीर झाला असून, पुरस्काराचे स्वरूप ५००० हजार रूपये, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र असे असून द्वितीय पुरस्कार अमरावती येथील लेखक संजय महल्ले यांनी कोरोनावर लिहिलेल्या ‘ काइमेरा’ या कादंबरीला देण्यात येणार असून त्याचे स्वरूप रुपये ३००० , सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र असे आहे. तर यातील तृतीय पुरस्कार औरंगाबाद येथील डॉ. रामकिशन दहिफळे यांनी संपादित केलेल्या ‘ परिवर्तनवादी साहित्य: संकल्पना आणि स्वरूप ‘ या ग्रंथाला जाहीर झाला असून त्याचे स्वरूप रुपये २००० रूपये व सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आहे.
सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी घोषित
वरील महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कारही यावेळी जाहीर करण्यात आले.यामध्ये'धगधगते तळघर' (उषा हिंगोणेकर), 'आतल्या विस्तवाची कविता ' (संजय चौधरी, नाशिक) , ' मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं ' (हबीब भंडारे, औरंगाबाद), ' आंबेडकरवादी वैचारिक साहित्याचे सौंदर्यबंध'(डॉ. युवराज मानकर, यवतमाळ) आणि'तळझिरा' (विद्या बयास ठाकूर, शिरूर ताजबंद जि.लातूर) यांचा समावेश आहे. यांच्या ग्रंथांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सदरील ग्रंथांचे परीक्षण डॉ. शंकर विभुते ( नांदेड), कवी शंकर वाडेवाले (पेठशिवणी ता. पालम) , डॉ. राजकुमार यल्लावाड (परळी वैजनाथ), डॉ. संजय कसाब (पूर्णा जि. परभणी), डॉ. संगीता घुगे (नांदेड), डॉ. संजय खाडप ( अंबेजोगाई), डॉ. मल्लिकार्जुन तंगावार (उदगीर), डॉ. बाळासाहेब दहिफळे ( उदगीर) आणि कवी मुरहारी कराड (अहमदपूर) या अभ्यासकांनी केले.
सदरील सर्व पुरस्कारांचे वितरण लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहितीही प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संयोजक डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब , डॉ.बब्रुवान मोरे, डॉ. सतीश ससाणे, डॉ.संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते