निराधार लोकांना घरपोच सेवा देणारी देशात लातूर बँक पहिली – आ.धिरज देशमुख
भातांगळी येथे समाधान शिबीर संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने लातूर तालुक्यात चांगले व अनुकरणीय काम केले आहे. निराधार वंचितांना लाभ मिळाला पाहिजे, यासाठी संगांयो समितीने गावपातळीवर जावून त्रेशष्ट जनजागृती व सुसंवाद बैठका घेतल्या व दहा समाधान शिबिरे घेऊन घरपोच मंजूर पत्र देण्याचेही काम सुरू आहे. निराधार योजनेची मंजुरी, उत्पन्नाचा, वयाचा दाखला आदी कागदपत्रे, निराधारांच्या पगाराचे वाटप यातील तांत्रिक अडचणी तहसील, महसूल, महा ई-सेवा केंद्र, बँक आदी विविध विभागाच्या समन्वयाने लातूर ग्रामीण संजय गांधी निराधार योजनेचे चेअरमन श्री.प्रवीण पाटील व सहका-यांनी लाभार्थ्यांना जलद व पारदर्शक लाभ मिळवून दिला आहे. केवळ आपसातील समन्वयाने हे काम सोपे झाले आहे. जिल्हा बँंकेनेही निराधारांचे अनुदान, पगारी घरपोच देण्याचे काम केले आहे. शेवटच्या घटकांपर्यंत त्यांचा हक्काची मदत मिळवून देण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे. असे करणारी ही देशातील एकमेव बँक आहे असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले. ते भातांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबीर कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रत्येकाचे जीवनमान उंचावले पाहिजे, त्यांना मदत करण्याचे काम संगांयो समितीने सामाजिक बांधिलकीतून केले जात आहे. लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्याचे काम सुयोग्य पद्धतीने सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. त्यामुळे संगांयो समिती गावपातळीवर जावून काम करीत आहे. संगांयो समितीसह लातूर जिल्हा बँकेने कोरोना काळात लाभार्थ्यांना घरपोच सेवा दिली. त्या कठीण काळात कौतुकास्पद काम केले. संगांयो समिती महाविकास आघाडीची असल्याने हे शक्य झाले. या आपल्या हक्काच्या सरकारमुळे शेतकरी कल्याणाचे काम केले. कोणत्याही जाचक अटी न लावता कर्जमाफी केली. पूर, अतिवृष्टीची नुकसानभरपाई वेळेत केली. सकारात्मक काम करण्याची सरकारची पद्धत आहे, त्यामुळे हे शक्य झाले. असे यावेळी आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले
नेत्यांचे मार्गदर्शन, प्रशासन, पदाधिकारी, संजय गांधी योजना समन्वयक व जिल्हा बँकेची साथ यामुळे निराधारांना न्याय देण्याचा प्रयत्न – प्रवीण पाटील
सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना अमितजी देशमुख साहेब व लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार धिरज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सहका-यांच्या समवेत आजतागायत ६३ गावांमध्ये जनजागृती व सुसंवाद बैठका घेऊन दहा ठिकाणी समाधान शिबीरे घेण्यात आले असून पात्र निराधारांना घरपोच मंजूर पत्र वितरण करण्यात येत असल्याचे सांगून त्रुटी पूर्तता बैठकांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे लातूर ग्रामीण संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे चेअरमन प्रवीण हणमंतराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, लातूर तालुका ग्रामीण संगांयो समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिन दाताळ, सहदेव मस्के, संजय गांधी निराधार योजना समिती चे सदस्य हरीश बोळंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेसाहेब पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर चे संचालक शंकर बोळंगे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, सरपंच परमेश्वर पाटील, चेअरमन व्यंकट जटाळ ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील, बालाजी सुरवसे,महा इ सेवा केंद्राचे संचालक नागनाथ लांडगे आदी उपस्थित होते.