हडपसर मधील मटका किंग बैजु बिनावत याच्या मटक्याच्या धंद्यावर पोलीसांचा छापा

हडपसर मधील मटका किंग बैजु बिनावत याच्या मटक्याच्या धंद्यावर पोलीसांचा छापा

पुणे (प्रतिनिधी) : हडपसर मधील मटका किंग बैजु बिनावत याच्या मटक्याच्या धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली. हडपसर परिसरात वर्धमान टाऊनशिप स. नं. ४४ हडपसर येथे बिल्डींग मधील गाळा नं.१ मध्ये सुरु असलेल्या मटका जुगार पैशावर गैरकायदेशिररित्या खेळत असलेचे निर्देशनास आल्याने पंचा समक्ष छापा टाकण्यात आला.

तर जुगार खेळणारे ३. खेळविणारे २ व पाहीजे आरोपी २ असे ऐकुण ७ इसमां विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४( अ)५ कायदेशिर कारवाई करण्यात आली.

१) शाहरूख मन्जुर शेख. वय. ४५वर्ष धंदा- जुगार रायटर रा. गल्ली नं. १७ सय्यदनगर हडपसर .२) राजु अंबादास शेरला. वय-२९ वर्ष धंदा- जुगार रायटर रा. ससाने नगर. म्हाडा कॉलनी. एच ११७ हडपसर. ३) बैजु बिनावत धंदा जुगार मालक. रा. सातव नगर. हडपसर. ४) नितीन भस्मे धंदा जुगार मॅनेजर रा. दरवडे वस्ती. हडपसर. ५) लक्ष्मण महादेव रामजी वय .५८ वर्ष रा. काळेपडळ. रेल्वे गेट जवळ हडपसर. ६) परशुराम बाळु काळे वय.३८ वर्ष रा. संयुक्त कॉलनी काळेपडळ हडपसर.७) भागवत बालाजी दमपसोरे वय-२७ वर्ष रा. वैदवाडी हडपसर. असे जुगार खेळताना मिळुन आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ हजार २५९ रुपयाच्या मुद्देमाला सह त्यामध्ये रोख ३ हजार २५० . जुगार साहित्य तसेच ५ मोबाईल हॅडसेट १९ हजार. व अन्य जुगाराचे साहित्यासह अटक करण्यात आले असुन बैजु बिनावत हा फरार झाला आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभाग. तसेच सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस उप- निरिक्षक सुप्रिया पंढरकर. पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत. हनमंत कांबळे. इरफान पठाण. अश्विनी केकाण. चव्हाण यांनी केली आहे.

About The Author