वैज्ञानिक दृष्टिकोन युवा पिढीमध्ये रुजविण्याची गरज आहे – डॉ मीनाक्षी नलबले
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे विज्ञानावर आधारित असणारा हा आपला देश यामध्ये अंधश्रद्धेच्य माध्यमातून अनेकांचे अज्ञानापोटी बळी गेलेला आहे. प्रत्येकाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन मानवाच्या व युवा पिढीच्या मनामध्ये रुजण्याची गरज आहे. येथे शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर विचार मंच या कार्यालयास भेट दिली. असता या वेळी डॉ मिनाक्षी नलबले यांनी आपले विचार मांडले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानदीप अकॅडमीचे उद्धवजी ईपर. रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवन कापसे.दिनकर मदेवाड. समाज कल्याण विभागाचे एस के कांबळे साहेब या वेळी उपस्थित होते. अंनिसच्या भुमिका व चळवळीत काम करत असताना येणाऱ्या अडचणी मेघराज गायकवाड यांनी सांगितले. पुढे बोलताना डॉ नलबले म्हणाले की गेल्या कित्येक दशका पासून जे अनिष्ट रूढी परंपरा कायम स्वरूपी चालत आले. ते कुठेतरी आता बदलण्याची गरज असून मानवाला विचार करण्यासाठी चागली बुद्धी दिली आहे .त्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. आपण 21 वे शतक म्हणून याकडे आपण पाहत असताना वैज्ञानिक दृष्टिक येणाऱ्या काळामध्ये विवेकी विचार व वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन वारसा समाजसुधारकांचा घेऊन मानवाने पुढे येण्याची गरज आहे. यातूनच समाजाची व स्वतःची उन्नती होऊ शकते. महाराष्ट्रातील नाही तरी महाराष्ट्राच्या बाहेर शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम त्यांनी केला आहे.आणि त्यांच्याच प्रेरणेमुळे महाराष्ट्रामध्ये लाखो दाभोळकर तयार झालेले असून.अहमदपूर शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हे कार्यकर्ते स्वखर्चातून काम करत आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.अहमदपूर ही माझी जन्मभूमी असून येथील शिक्षणामुळे मी राज्यात प्रथम आले. माझीही समाजाचं देणं लागते. म्हणून मी प्रायव्हेट प्रॅक्टिस न करता पुणे येथे शासकीय ससून रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया प्रमुख बालरोगतज्ञ म्हणून काम करत आहे. मी तब्बल साडेतीन हजार अवघड शास्त्रीय करून बालकांना जीवदान दिले आहे. पुढेही निस्वार्थपणे काम चालूच राहणार आहे .मी 1992 च्या नंतर तब्बल 30 वर्षांनी अहमदपूर येण्याचा योग अंनिसच्या कार्यकर्त्यांमुळे आला. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मिळून जोमाने काम करू या असे मत डॉ मीनाक्षी नलबले यांनी व्यक्त केले. यावेळी माजी मुख्याध्यापक शेषराव ससाने.अंजली वाघबंर.पूजा गायकवाड. ईजीनिअर पल्लवी गायकवाड .समीक्षा कांबळे.संदीप गायकवाड चिमणराव कांवळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले.