लातूरची फेन्सर निघाली कॉमनवेल्थ वारीला

लातूरची फेन्सर निघाली कॉमनवेल्थ वारीला

अहमदपूर (गोविंद काळे) : कटक येथे पार पडलेल्या नॅशनल फेन्सीग टुर्नामेंट व कॉमनवेल्थ निवड चाचणी स्पर्धेत अहमदपूर येथील लातूर जिल्हा ततवारबाजी संघटनेची स्टार खेळाडू झानेश्वरी शिंदे हिने इप्पी वैयक्तिक प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावत भारतातून द्वितीय क्रमांक मिळवला. त्यामूळे दि. 9 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रिय कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तीची भारतीय संघात निवड झाली आहे. याबद्दल लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्री अभिजीत मोरे, सचिव तथा श्री शिवछत्रपती राज्य पुरस्कारप्राप्त प्रा. श्री दत्ता गलाले, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काबरा , यशवंत विलयालयाचे मुख्याध्यापक श्री. गंपले, आहिल्यादेवी माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत माने, किलबिल नॅशनल स्कूलचे प्रमुख ज्ञानोबा भोसले, जय हिंद स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य, लातूर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या सदस्यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिला प्रशिक्षक वजिरुद्दीन काजी, वैभव कज्जेवाड, मोहसीन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे, मैफूजखान पठाण यांनी प्रशिक्षीत केले. साधन सुविधेचा अभाव असतानाही अहमदपूर सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूने मिळवलेल्या या यशाबद्दल लातूर जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांकडून ज्ञानेश्वरी शिंदे हिचे व तिच्या प्रशिक्षकांचे कौतुक होत आहे.

About The Author