लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश

लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश

डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाला यश

अहमदपूर (गोविंद काळे) : रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील लातूर ते नांदेड या भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजून वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत ठेवण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा चे प्रकल्प संचालक सूनिल पाटील साहेब यांनी संबंधित कंत्राटदारास लेखी आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीचे काम मोठ्या जलद गतीने सुरुवात आहे. हा रस्ता बऱ्यापैकी पूर्णत्वास गेलेला आहे.मात्र अनेक ठिकाणी वळण रस्तापुल बांधकाम, जागेचा प्रश्न,कांही तांत्रिक अडचण, रस्ता दुभाजक आदी कारणांमुळे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम ठिक ठिकाणी प्रलंबित आहे. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लातूर ते चाकूर आणि पुढे चाकूर ते लोहा या भागात या रसत्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाहतुकीची अडचण येत आहे.परिणामी दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. वहाने कसरत करून चालवावे लागत आहेत म्हणून लवकरात ललकर संबंधित रस्ता सुस्थितीत ठेवन्याबाबत युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्र व्यवहार केला होता याची तातडीने दखल घेवून कर्तव्यदक्ष अधिकारी प्रकल्प संचालक सूनिल पाटील यांनी कंत्राटदारास लेखी आदेश दिले आहेत. हे आदेश प्राप्त होताच विशेषतः चाकूर च्या दोन्ही बाजू कडून चाकूर ते लातूर व चाकूर ते लोहा भागातील खड्डे बुजविण्यास सूरूवात देखील झाल्याचे आशादायी चित्र पहावयास मिळाले.

About The Author