महात्मा फुले महाविद्यालयात रामदास काटापल्ले यांचा सत्कार

महात्मा फुले महाविद्यालयात रामदास काटापल्ले यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रहिवासी तथा धर्मापुरी येथील शंकरराव गुट्टे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक काटापल्ले रामदास नरसिंगराव यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालय प्राचार्य वसंत बिरादार पाटील यांनी डॉ. काटापल्ले यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, रामदास काटापल्ले हे रसायनशास्त्राचे गाढे अभ्यासक असून त्यांनी प्रो. डॉ. सय्यद हुसेन सज्जनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच -डी .चे संशोधन पूर्ण केल्याबद्दल त्यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ने रसायनशास्त्रातील पीएच.डी. ही पदवी प्रदान केली. याबद्दल डॉ. काटापल्ले यांचा महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

या सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटील यांनी तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर , प्रो. डॉ.अनिल मुंढे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, प्रा. अतिश आकडे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर आदी उपस्थित होते.

About The Author