आंतरजिल्हा बदली धारक शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण

आंतरजिल्हा बदली धारक शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण

शिक्षक संघटनेने ग्रामविकास विभागाचे अवर सचिव राजेशकुमार व बदली गटाचे अध्यक्ष,तथा
मुख्यकार्यकारी अधिकारी अयुषप्रसाद यांना दिले निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : आंतरजिल्हा बदली धारक शिक्षक हा ज्या जिल्हा परिषद कार्यरत आहे तीच जिल्हा परिषद ना हरकत प्रमाणपत्र देत असते आणि ह्या पूर्वीच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ह्या सुद्धा शिक्षक ज्या जि.प. मध्ये कार्यरत आहे त्या जि.प ने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र च्या आधारे च झालेल्या आहे. परंतू दि. २१ जुलै रोजी झालेल्या व्हीसीमधील मुद्यामध्ये ज्या जिल्हयामध्ये आपणास जायचे आहे त्या जिल्हयाची एनओसी आपल्याकडे पाहीजे केवळ स्व जिल्हयाची एनओसी चालत नाही असे नमुद केल्याने आंतरजिल्हा बदली धारक शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने शिक्षक सहकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राजाध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदणात दि. 10 जून 2022 च्या पत्रकात मुद्दा क्र. 5 मुळे व आजच्या झालेल्या राज्यस्तरीय व्हि सी मधील दोन जिल्ह्यांच्या एन ओ सी च्या मुद्द्यामुळे आंतरजिल्हा बदली धारक शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या परिपत्रक मध्ये आंतरजिल्हा बदली प्रकरणात, बदलीपात्र शिक्षकाकडे ज्या जिल्हा परिषदेमध्ये जायचे आहे. त्या जिल्हा परिषदेकडील बिंदु नामावलीनुसार पद रिक्त असल्याचे / भविष्यात रिक्त होणार असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आहे. अशाच शिक्षकांचा ना-हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षकांत समावेश करावा. आसे पत्रकात नमुद आहे. ना हरकत प्रमाणपत्र हे आंतरजिल्हा बदली धारक शिक्षक हा ज्या जिल्हा परिषद कार्यरत आहे तीच जिल्हा परिषद देत असते आणि ह्या पूर्वीच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ह्या सुद्धा शिक्षक ज्या जि.प. मध्ये कार्यरत आहे त्या जि.प ने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र च्या आधारे च झालेल्या आहे. दि. 10 जून 2022 परिपत्रक नुसार व आजच्या व्हि सी नुसार जर कार्यवाही झाली तर शिक्षकांना जाऊ इच्छित असलेल्या जि.प चे ना हरकत प्रमाण पत्र घ्यावे लागेल ह्यामुळे ही प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होईल सोबतच ह्या मध्ये खूप कालावधी जाईल व पुन्हा ना हरकत मिळविण्यासाठी आर्थिक व्यवहार सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 10 जून 2022 च्या परिपत्रक नुसार जर जाऊ इच्छित असलेल्या जि.प चे जर ना हरकत पत्र मिळाले तर संबंधित शिक्षकांची ती आंतरजिल्हा बदली समजल्या जाईल.
2016 पासून ऑनलाइन बदली धोरण प्रक्रिया आल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देणे बंद आहे. करिता 2016 पूर्वी ज्या शिक्षकांकडे कार्यरत जि.प. चे ना हरकत प्रमाणपत्र आसेल त्यांना प्रथम प्राधान्य देऊन 10 जून 2022 च्या पत्रकात बदल करून व आजच्या व्हि सी दोन्ही जिल्ह्याच्या एन ओ सी चा मुद्दा रुद्द करुनच आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही करावी हि नम्र विनंती. तसेच एन ओ सी मध्ये सेवाजेष्टता हि निकष न धरता. एन ओ सी दिनांकानुसारच प्राधान्य देण्यात यावे.कारण सेवाजेष्ट्यता हा निकष ठेवला तर 2007 पासुन एन ओ सी मिळुन ही प्रतिक्षा यादित आसलेला शिक्षक 2015 ला एन ओ सी मिळालेल्या शिक्षकापेक्षा ज्युनिअर आसेल तर 2007 एन ओ सी मिळुन प्रतिक्षा यादित आसलेल्या शिक्षकावर मोठ्या अन्याय होईल.त्यामुळे एन ओ सी दिनांकानुसारच प्राधान्य देणे योग्य. त्यामुळे 10 जुन च्या पत्रात योग्य तो बदल करुन एन ओ सी धारकांना न्याय द्यावा. असे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी दिलेल्या निवेदनात आहे.

About The Author