श्यामलाल हायस्कूलच्या एन.सी.सी.कॅडेट ची थल सेना कॅम्प आणि रिपब्लिक डे कॅम्प साठी निवड
उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मधील नॅशनल कॅडेट कॉर्प्स विभागातील कावळे वैष्णवी या विद्यार्थिनीची अहमदनगर आणि दिल्ली साठी निवड झाली आहे. या यशाबद्दल कावळे वैष्णवी या विद्यार्थिनीचे संस्था अध्यक्ष ऍड .सुपोषपाणि आर्य ,उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर , सचिव ऍड.विक्रमजी संकाये , सहसचिव अंजुमणी आर्य, संस्थेचे माजी उपाध्यक्ष ऍड.सलगरे यांनी शुभेच्छा दिल्या.
संस्थाध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी याप्रसंगी ‘ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अशा प्रकारच्या विविध उपक्रमात सहभाग घेऊन समाजसेवा, देशभक्ती, देशसेवा करण्याच्या कार्यात सहभाग घ्यावा, देशरक्षणाच्या कार्यात तरुणांनी सदैव तत्पर राहण्यासाठी शरीर व मन सुदृढ ठेवावे.आपल्या शाळेतील कावळे वैष्णवी या विद्यार्थिनीची T. S. C. व R. D. C. कॅम्प साठी निवड झाली ही खूप अभिनंदनीय व कौतुकाची बाब आहे असे मनोगत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा सत्कार केला.