स्वातंत्र चळवळ व स्वातंत्र प्राप्ती नंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे मोठे योगदान – माजी आमदार वैजनाथ शिंदे
जिल्हा काँग्रेस च्या वतीने अमृत महोत्सवी निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचा रोकडा सावरगाव येथे शानदार शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व स्वातंत्र प्राप्ती नंतर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू ते डॉ मनमोहन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने दिलेले योगदान जडणघडणीत मोलाचा वाटा राहिलेला आहे हे वास्तव्य चित्र जनते पर्यंत आज पोहोचवण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार वैजनाथ जी शिंदे यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते मंगळवारी लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या आझादी गौरव पायी पदयात्रेचा शुभारंभ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढें बोलताना माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले की, देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा काँग्रेस नेत्यांनी जसा उचलला त्याच धर्तीवर महाराष्ट्रात व लातूर जिल्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मोठया प्रमाणावर विकास केला पूर्वी आपला मागास भाग म्हणून ओळखले जायचे मात्र गेल्या ४० वर्षात आपल्या भागाचा कायापालट झाला आहे हे काम आपले नेते लोकनेते विलासराव देशमुख साहेब शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे यांनी केले आहे साठवण तलाव निर्माण झाली साखर कारखाने, एमआयडीसी झाली हे आपल्या काँग्रेसच्या काळात नेतृत्वाने ऊभे केले आहे त्यामूळे जिल्ह्यांतील आज सगळीकडे चोहीकडे सुख समृध्दी मिळत आहे जिल्हा बँक, साखर कारखाने चांगले चालत आहेत त्यामुळे आपले मूल परदेशात शिक्षण घेवून उच्च पदावर कार्यरत आहेत हे केवळ काँग्रेस च्या नेत्यांमुळे शक्य झाले आहे हे वास्तव्य चित्र दिसून येत आहे त्यामुळे केंद्रातील एनडीए सरकार चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत आहे सरकार महागाई, शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल निरुत्साही आहे याचाही विचार व्हायला हवा असे सांगून सरकारला धडा शिकवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे प्रदेश सचिव अभय साळुंके, पदयात्रा समन्वयक प्रवीण पाटील, जिल्हा महीला काँग्रेसच्या अध्यक्षा सूर्यशिला मोरे,काँग्रेसच्या विविध फ्रंट चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, एकनाथ पाटील, हरीराम कुलकर्णी, शरद देशमुख प्रवीण सुर्यवशी, सिरजोद्दिन जहागीरदार, सुरेश चव्हाण, रमेश सूर्यवंशी, शिलाताई पाटिल, अँड हेमंत पाटील, विलास पाटील उपस्थित होते.
देशाच्या राज्याच्या जडणघडणीत काँग्रेसच्या नेते मंडळी यांचा सहभाग – जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे पासून नेहरु ते मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाला औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विकासाची ब्ल्यू प्रिंट काँग्रेसच्या सरकारने दिलेले आहे सध्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकार ने महागाई शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल चुकीचे निर्णय घेवून आर्थिक पिळवणूक करण्याचे काम सुरू केले आहे हे कुठे थांबवण्याची गरज असून आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपण ताकत द्यावी असे सांगून लातूर जिल्ह्यात विकासाच्या नव्या संकलपना ब्लू प्रिंट काँग्रेसच्या काळात नेतृत्वाने ऊभे केलेल्या आहेत त्या कार्याची प्रेरणा घेवुन भविष्यात आपल्या भागांतील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे असेल किंवा विकासकामे करण्यासाठीं पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ब्रिटिशा पेक्षा मोदी सरकार लुटारू – अभय साळुंके
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके यांनी सध्याच्या परिस्थितीत देशात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारांच्या चुकीच्या निर्णयाचा पाढा वाचला अनेक सरकारी कंपन्या विकल्या अनेक लोकांना घरी बसवण्याचे काम केंद्रातील एनडीए सरकार चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत आहे पूर्वीचे ब्रिटिश सरकार बरे होते त्यापेक्षा खतरनाक मोदी सरकार असून देशाला मागे घेवुन जाण्याचे काम करीत असताना लोकांनी याचाही विचार करण्याची गरज आहे आहे असे सांगून राज्यात देशातील स्वातेंत्र पूर्व व स्वातंत्र्य मिळवून दिल्यावर देशातील विकासात पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर इंदीरा गांधी, राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे हे विसरून चालणार नाही सत्तेत बसलेले लोक इतिहास पुसायला जात आहेत त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे आपण जे जे चांगल काम केले आहे ते समाजाला सांगितल पाहिजे त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक ठरेल असं कार्य देशाच्या राज्याच्या जडणघडणीत काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मिळून चांगले कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ताकत द्यावी असे सांगून भविष्यात आपले नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख साहेब यांच्या मागे ताकत द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रोकडा सावरगाव येथील कार्यक्रमात गावातील स्वातेंत्र सैनिकांचा सत्कार माजी आमदार वैजनाथ शिंदे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे अभय साळुंके यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर पदयात्रा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात रोकडा सावरगाव येथे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पायी पदयात्रेसाठी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
संवाद बैठका स्वागत पदयात्रेत काँग्रेसचा नारा
आनंदवाडी, हिंपळनेर, नायगाव चापोली, आनंदवाडी पर्यंत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी चालत भारत माता की जय काँग्रेस पक्षाचा विजय असो इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या जयघोष करीत पदयात्रा सुरू झाली अनेक ठिकठिकाणी काँग्रेसच्या पदयात्रेत ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात स्वागत केले अनेक ठिकाणी मान्यवरांनी कॉर्नर बैठका घेतल्या संवाद साधला लोकांनी खुप मोठा प्रतिसाद दिला आहे.
या पदयात्रेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव मस्के, अहमदपूर काँगेस सोशल मीडिया अध्यक्ष राजकुमार पाटील, पपू शेख, सलीम तांबोळी, निलेश देशमुख, शामराव सुर्यवंशी, ललिता झिले, सांभ महाजन, विकास महाजन, चंद्रकांत मद्दे, राम घोटे, सरपंच प्रवीण जाधव, सोसायटीचे चेअरमन दीपक जाधव, दिनकर पाटील, उपसरपंच नाथराव रोकडे, अनिल चव्हाण, करमुडे, शिवाजी चव्हाण, गोपाळ चव्हाण, सुवर्णा रोकडे, अमर वलांडे, रत्नदीप आजनिकर विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले.