अवैध दारु विक्री आड्यावर भादा पोलीसांची छापेमारी; 22,150 रु. चा मुद्देमाल जप्त
लातूर (प्रतिनिधी) : दि.08 आॅगस्ट 22 रोजी भादा पोलीस ठाण्याचे स.पो. निरीक्षक विलास नवले व त्यांच्या सहकार्यानी गोपनीय पद्धतीने पोलीस स्टेशन हद्दीत बऱ्याच गावात अचानक अवैध दारू विक्रेत्यांवर छापे मारले, व मुद्देमाल जप्त करून आरोपी अटक केले. यामध्ये मुख्यतः शिवली, आशिव, बोरगाव, काळमाथा, बेलकुंड या गावात अवैध दारू विक्री करताना मिळून आलेल्यांना गावातच तसेच पोलिस स्टेशन येथे नेवून चांगलाच पोलिस खाक्या दाखवला. व त्यांची नशा उतरवली. या छापेमारीत काही गावात बरेच दिवसांपासून अवैध दारू विकत असूनही पोलिसांना गुंगारा देणारे मिळून आल्याने गावकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गावात कोणीही अवैध दारू विक्री करू नये अन्यथा गावभर मिळालेली दारु घेऊन फिरवून वरात / धिंड काढली जाईल अशी तंबी देण्यात आली आहे. गावात कोणीही अवैध दारू विक्री करत असल्यास आम्हास, पो स्टे भादा व दारुबंदी विभाग, लातूर यांना नागरिकांनी माहिती द्यावी. माहिती देणार यांचे नाव गुपित ठेवले जाईल.
अवैध दारू साठा जप्त करून गुन्हे दाखल केले.
मौजे शिवली येथे 1) मायाबाई संजय बिसवास
2) संजय मणमान बिसवास
3) अक्षय कीशन भोसले सर्व रा.शिवली याच्याकडे 90 एम.एल.च्या 470 बाटल्या कीमंत 18,800/- रूपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यांच्या विरुद्धगु.र.नं.140/22 क.65 (अ),81,83 दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा क्र.02 – 1) सोमनाथ शिवाजी सुरवसे वय 35 वर्ष रा.शिवली 2) आशोक शंभुदेव काकडे वय 23 रा.औसा
मुद्देमाल-देशी दारू 90 एम एल च्या 40 बाटल्या कीमंत रु.1600/- हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या विरोधात गु.र.नं.139/22 कलम 65 (अ),81,83 दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा क्र:-3 मौजे आशिव 1) वंसत विश्ववनाथ लोंडे वय 65 वर्ष मुद्देमाल:- देशी दारु कीमंत 400/- रू. यांच्या विरुद्ध गु.र.नं 138/22 कलम 65 (अ) गुन्हा दाखल.
गुन्हा क्र.4 मौजे काळमाथा 1) व्रंदावन विश्वास पवार वय 44 वर्ष. मुद्देमाल -10 लीटर गावठी हातभट्टी कीमंत 500/- रू. यांच्या विरोधात गु.र.नं 135/22 क 65 (अ) गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा क्र:-5 मौजे बोरगाव 1). दत्ता अंकुश आबाड याच्याकडे
मुद्देमाल -15 लीटर हातभट्टी दारू कीमंत 750/- रू. यांच्या विरोधात गु.र.नं.136/22 क 65 (अ) गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा क्र.6 मौजे बेलकुंड येथे पापा मानिक राठोड यांच्या कडे मुद्देमाल- देशी दारू कीमंत 400/- रू. यांच्या विरोधात गु.र.नं. 137/22 क.65 (अ)
पो.स्टे. हद्दीत कार्यवाही करूनही पुन्हा अवैध दारू विक्री करणार्या जवळपास आठ ईसमावर म. पोलिस कायद्यान्वये हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले असून, आणखी इतर अवैध दारू विक्रेत्यांचे हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.
सदरची कामगिरी भादा पोलीस स्टेशनचे सपोनी- व्ही.एस. नवले, सफौ- महादेव गिरी, भिमु देवकर, पोहेका- चंदू सूर्यवंशी, टोपे, नापोका – शिवरुद्र वाडकर, चंद्रकांत कलमे, विठ्ठल दिंडे, डोलारे, चौघुले आदींनी परिश्रम घेतले.