ग्रामीण भागातील बहुतांश जुने शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत – अ‍ॅड. गुलाबराव पटवारी

ग्रामीण भागातील बहुतांश जुने शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत - अ‍ॅड. गुलाबराव पटवारी

उदगीर (एल.पी.उगिले) : लातूर जिल्ह्यातील बहुतांश जुने शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत आहेत. असा दावा शिवसेनेचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे, ज्येष्ठ विधिज्ञ शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख अॅड. गुलाबराव उर्फ बापूराव पटवारी यांनी स्पष्ट केले आहे.अॅड.पटवारी म्हणजेअमोघ वक्तृत्व,उतुंग कर्तृत्व आणि आपले लाडके नेतृत्व असे व्यक्तिमत्व आहे.
ते सांगतात की, लातूर जिल्ह्यातील जुने शिवसैनिक आमच्या सोबत आहेत, शिवसेनेमध्ये कार्य करत असताना संघर्ष काय असतो? हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अनुभवले आहे. त्या कार्यकर्त्यांना त्या त्या वेळी आधार देऊन, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यात शिवसैनिकांची मोफत जामीन करून देणे,त्यांची मानसिकता सांभाळून आत्मविश्वास वाढवणे. अशा पद्धतीचे मोठे काम जेष्ठविधीज्ञ गुलाबराव पटवारी यांनी केले असल्याने त्यांच्या निर्णयासोबत मोठ्या संख्येने शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत जात असल्याची खात्री त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवली आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आम्हाला शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बद्दल अजूनही आपल्या मनामध्ये आदर आहे, मात्र या परिवाराच्या भोवती असलेल्या चौकडीने खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या शिवसैनिकाला कधी मान दिला नाही, किंवा मातोश्रीच्या संपर्कात येऊ दिले नाही. असा आरोपही याप्रसंगी गुलाबराव पटवारी यांनी केला आहे.
गुलाबराव पटवारी यांच्या सोबतच आता माजी खासदार खैरे यांच्या वागणुकीला वैतागून ज्येष्ठविधीज्ञ तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बळवंतराव जाधव यांनी देखील शिंदे साहेबांच्या गटातच खऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या दोन ज्येष्ठविधीज्ञांनी लातूर जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे रोवली, शिवसेना वाढवली. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात सक्रिय राहून कित्येक गुन्हे आपल्या अंगावर घेतले. आपल्या सोबत सहभागी असलेल्या शिवसैनिकांना आधार दिला. अशा ज्येष्ठ शिवसैनिकांना लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सापत्न भावाची वागणूक देऊन, शिवसैनिकांना सतत डावलले. शिवसैनिकांची अवहेलना केली.

यामुळे जुने शिवसैनिक मोठ्या संख्येने शिंदे साहेबांसोबत सक्रिय होत आहेत. शिवसेनेतील मोठ्या कलहानंतर शिवसेना आमचीच खरी, आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे पाईक असल्याचे सांगत हे जुने शिवसैनिक एकनाथराव शिंदे यांचीच बाजू योग्य आहे. असे सांगत आहेत. शिंदे साहेबांची लातूरला लवकरच सभा घेऊन लाखोंनी शिवसैनिक शिंदे साहेबांच्या सोबत राहतील. असा विश्वासही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गुलाबराव पटवारी यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य उचलले असून त्यांच्यासोबत लातूर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक आहेत. आज स्पष्टपणे जरी ग्रामीण भागातून आवाज उठत नसला तरी एक सभा झाल्यानंतर सर्व शिवसैनिकांची पुन्हा एकदा एकजूट करून शिवसेनेची शक्ती उभा करू. असा विश्वासही संघटन कुशल व्यक्तिमत्व, ज्येष्ठ शिवसैनिक गुलाबराव पटवारी यांनी व्यक्त केले आहे.

1993 साली उदगीर शहरात बाबरी मशिदीच्या निमित्ताने मोठी दंगल झाली होती. त्यानंतर हे शहर तणावात होते,याच काळात भाजी मंडईत गुलाबराव पटवारी यांच्या गाडीवर दगड फेकला गेला, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चांगला तणाव निर्माण झाला होता. मात्र अत्यंत संघटन कूशल नेतृत्व आणि संयमी व्यक्तिमत्व असल्याने गुलाबराव पटवारी यांनी जिल्हाभरातील शिवसैनिकांना समजावून सांगून, त्या काळातील तणाव निवळला पाहिजे. यासाठी ठीक ठिकाणी दौरे केले होते.

समाजात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिली पाहिजे या दृष्टीने ते काम करतात. गेल्या कित्येक वर्षापासून सार्वजनिक गणेश महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. गणेश मंडळाची मिरवणूक असेल, सजावट असेल, विविध सामाजिक उपक्रमाचे देखावे असतील, या सगळ्याचे नियोजन अत्यंत कुशल पणे सर्वांना सोबत घेऊन गुलाब पटवारी करतात. त्यामुळे ते एक लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या एका हाके सरशी हजारो युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक हजर होऊ शकतात. अशा या व्यक्तिमत्त्वाने पुन्हा सक्रिय भूमिका घेतल्यामुळे निश्चितपणे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. अशा पद्धतीची चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जाणकार राजकारणी लोक व्यक्त करत आहेत.सामाजिक सलोखा टिकऊन ठेवण्यासाठी गुलाबराव पटवारी यांनी जिल्हाभरातील शिवसैनिकांना नेहमी समजावून सांगत असतात, पूर्ण ताकतीने भूमिका मांडायची मात्र त्याचा कोणी गैर फायदा घेणार नाही, किंवा आपल्या सोबत सहभागी असलेल्या शिवसैनिकांना आधार देतानाच आपली भूमिका ते सष्ट करतात, विशेषतः शांतता कमिटीत सक्रिय राहून शांतता टिकुन राहावी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न लाख मोलाचे आहेत.

About The Author