आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रयत्नातून शहरासाठी 17 कोटी रुपयांची कामे प्रगती पथावर
कासार सिरसी येथील विकास कामाला वेग
कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : महाराष्ट्रात सर्वत्र विकासपुरुष असे संबोधले जाणारे औसा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या सातत्य प्रयत्नातून शहराच्या विकास कामासाठी तब्बल 17 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
दि,7/8/2022रोजी शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून जलजीवन योजना मंजूर करून घेऊन त्याच पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन करण्यात आले.तर मागील चार दिवसा पूर्वी येथील भव्य बस स्थानक इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आले. असेप्रकारे शहरातील विकास कामाला वेग आल्याचे दिसून येत आहे.
या भागाचे लोकप्रिय आमदार यांनी यापूर्वी येथील जनतेला अनेक विकास कामे करण्याचे वचन दिले होते ते आता पूर्ण करत असल्याचे दिसत आहे.
आमदार पवारसाहेबांनी सात्यताने पाठपुरावा करून कासार सिरसी शहरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत फिल्टर ( शुद्ध )पाणी पुरवठा ही योजना असून त्यात नेलवाड पाझर तलावातून पाच किलोमीटर अंतरावून मोठी पाईप लाईन करून जिंदावली दर्गा या टेकढीवरती टाकी बांधून तेथे शुद्ध करून नळाद्वारे शहरातील जनतेला शुद्ध पाणी देण्यादुरष्ठीने टाकी बांधण्यासाठी भूमिपूजन आमदार अभिमन्यू पावर साहेब व अन्य पदाधिकारांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी आमदार अभिमन्यू पावर, येथील सरपंच सौ, दिपालीताई पांचाळ उपसरपंचपदी बडेसाहेब लकडहरे, नायब तहसीलदार श्री महापुरे साहेब, एपीआय रेवनाथ डमाळे, कार्यकारी अभियंता श्री कायंदे साहेब, उपकार्यकारी अभियंता पाटील साहेब,शाखा अभियंता राठोड साहेब, विस्ताराधिकारी आडेसाहेब, शाखा अभियंता स्वामी साहेब मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, ऑड, परिक्षित पवार, डोणगापुरे राजु, धनराज होळकुंदे, जिलानी बागवान, भास्कर पाटील, नाना धुमाळ, बालाजी ऑढा, परमेश्वर बिराजदार गोरख होळकुंदे विठ्ठल गुप्ता अनिस बेडगे योगेश चिंचनसूरे विरेशचिंचनसुरे विवेक कोकणे, सुरेश बरकंबे ज्ञानेश्वर मडोळे नितीन पाटील संदीप बनसोडे रायाप्पा मंडले किरण किवढे सायबा कानडे अन्य पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योजनेमुळे शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे तसेच नागरिकांना हे पाणी उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
कासार सिरसी परिसरातील सर्व प्रलंबित असलेले कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन याठिकाणी आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या वतीने देण्यात आले.
आमदार साहेबांच्या या कार्यामुळे येथील जनता समाधान व्यक्त करताना दिसत आहे.