तीरुके यांना राज्यस्तरीय शाहू पुरस्कार

तीरुके यांना राज्यस्तरीय शाहू पुरस्कार

उदगीर (प्रतिनिधी) : भाजप नेते,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांना इंडियन स्टुडन्ट कौन्सिलच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.

रामचंद्र तिरके यांच्या सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.डॉ.जयसिंगराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सोमनाथ कदम,डॉ.अमर कांबळे यांच्यासह शिवाजीराव परुळेकर,नंदकुमार गोंधळी,डी.जी.भास्कर,बाजीराव नाईक,इंडियन स्टुडन्ट कौन्सिल महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजकारण हे समाजकारणाचे माध्यम मानून त्या अनुषंगाने आपण कार्य करत आहात.विविध क्षेत्रात सतत कार्यरत असल्याने आपले राज्यातील हजारो व्यक्तींशी संबंध जुळलेले आहेत. या दृष्टीने आपण ‘श्रीमंत’व्यक्ती आहात.शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आलेली आहे,अशा आशयाचे गौरवपत्र सत्कार प्रसंगी तिरुके यांना प्रदान करण्यात आले.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रामचंद्र तिरुके यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

About The Author