स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खरेदी विक्री संघात स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खरेदी विक्री संघात स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार

उदगीर : येथील स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह. खरेदी विक्री संघ मर्या. उदगीर संघाचे चेअरमन तथा राज्य कापूस फेडरेशशनचे संचालक भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य चळवळ व परकीय शक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी विचाराने प्रभावीत होऊन लढलेले स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी घरावर तुळसीपत्र ठेवून राष्ट्रप्रेम या एकमेव भावनेने संघर्ष केलेल्या, हयात असलेल्या स्वातंत्र्य सेनानी गोरखनाथ माधवराव भंडे मु.दावणगाव, त्र्यंबक शरणप्पा साकोळकर मु. देवर्जन, पंढरीनाथ रामचंद्र तिरुके मु. सताळा बु., मन्मथप्पा भद्रप्पा ‍चिल्ले मु. करडखेल, प्रभू नरसिंग डोईजोडे मु. बागवान गल्ली उदगीर, तुकाराम गोविंदराव चामले मु. यशवंत सोसायटी उदगीर. यांच्यावर संघाच्या प्रवेशद्वाराहून पुष्पवृष्टी करत मंचापर्यंत पाचारण केले.
तद्नंतर खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या प्रतिमेचे स्वातंत्र्य सेनानी यांच्या हस्ते पुजन करून त्यांना मानाचा तिरंगा फेटा, सन्मानचिन्ह, शॉल, पुष्पगुच्छ, व तिरंगा झेंडा देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुरेश पाटील, ला.जि.म.सह. बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, व्हा. चेअरमन शंकरराव पाटील तळेगावकर, संचालक – व्यंकटराव पाटील, विठ्ठलराव मुळे, किशनराव हारमुंजे , मारोती पोमा पवार, वसंतराव सोनकांबळे, शशीकांत ‍चिद्रे, संचालिका-मालनबाई कोनाळे, रुक्मीणबाई बिरादार. व सर्व कर्मचारी तसेच भालचंद्र घोनसीकर, बाळासाहेब नवाडे, उमाकांत बिरादार, उमाकांत तोगरगे, हरी पाटील, विजय येडले, राजू चामले, व पत्रकार वृंद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी मन्मथ चिल्ले यांना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला. तसेच सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर संपुर्ण महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राजकीय व्यवस्था, भ्रष्टाचार यांच्या विरुध्द कोणी लढा दिला नाही, अशी खंत व्यक्त केली. भारत माता की जय, वंदे मातरम्, या घोषणांनी सोहळ्याचे वातावरण संपुर्ण राष्ट्रभक्तीमय होवून गेले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब नवाडे यांनी केले तर आभार भरतभाऊ चामले यांनी मानले.

About The Author