नवनाथ गायकवाड यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड
उदगीर (एल.पी. उगिले) : येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांची पक्षातील कामाची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.जानबा मस्के व सेवादल प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांच्या आयोजित बैठकीत मराठवाड्यात सेवादल संघटन वाढविण्यासाठी नवनाथ गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड केली. या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
नवनाथ गायकवाड हे पक्ष स्थापनेपासून पक्षासोबत एकनिष्ठ राहीलेले कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे मराठवाडा निरीक्षक म्हणून तात्कालीन सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष कै. दिपक मानकर यांनी जबाबदारी दिली होती. संपूर्ण मराठवाडा दौरा करून मराठवाड्यात सेवादलाचे संघटन त्यांनी उत्तम रित्या पार पाडले. सर्व कामाची दखल घेऊन त्यांना मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदाची अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे.
सेवादलाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री आ.संजय बनसोडे, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील व राष्ट्रवादी उदगीर तालुका अध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजी मुळे यांच्या आदेशावरून ” जिथं कमी तिथं आम्ही ” या उक्तीप्रमाणे सेवादलाची टिम काम करत असते. सेवादलाच्या माध्यमातून नवनाथ गायकवाड यांनी कोरोना सारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेच्या दारात अन्नधान्य किट घेऊन जाणारा कार्यकर्ता, पक्षाने आदेश द्यावा तो शिरसावांद, जीवाची बाजी लावून काम करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. या सर्व कामांची दखल घेऊन पक्षाचा विचार मराठवाड्यात सेवादलाच्या माध्यमातून घराघरात पोहचवण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा मस्के व सेवादलाचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र लावंघरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.