ओला दुष्काळ जाहीर करा; प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा; प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : मागील १५ दिवसापासून तालुक्यात सतत पाऊस सुरु असल्या मुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. हे मान्य करून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. पंचनामे करण्याची औपचारिकता न करता केवळ पीक नोंदणी पाहून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील अतिवृष्टी मुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील सोयाबीन, मूग, कपाशी, मिरची, मका आदी पिके मातीत गेली आहेत. शेतकऱ्यांचे व शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहेत. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा प्रहार जनशक्ती युवक आघाडी मार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्या वेळी उपस्तित तालुका युवक आघाडी प्रमुख आशुतोष खोत, तालुका उपाध्यक्ष वाजीद पठाण ,तालुका सचिव संस्कार ठाकुर ,शहर प्रमुख दिनेश जाधव, शहर सहसचिव शैलेश कांबळे, शहर उपाध्यक्ष कृष्णा पिंपळे, कलीम सावरे, बंकट पवार व प्रहार कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author