वळसंगी येथील शेतकऱ्यांचा केवायसी ई – पीक नोंदीला प्रतिसाद
अहमदपूर शेतकरी उत्पादक कंपनी लि.चा उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील वळसंगी या गावी ग्रामस्थांनी अहमदपूर शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांच्यावतीने शेतकरी बांधवासाठी ठेवण्यात आलेल्या केवायसी व ई पीक पाहणी या कॅम्पला भरभरून प्रतिसाद दिला. नुकत्याच पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान केलेले आहे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने शेतकरी बांधवांना विनंती करण्यात आली होती की लवकरात लवकर मोबाईल मध्ये पीक पाहणे करावे तसेच प्रधानमंत्री सन्मान निधी के .वाय .सी यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावे आले नाहीत त्यांनी त्वरित आधार लिंक करून घेणे असे आव्हान प्रशासनाकडून देण्यात आले आहेत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर पीक पेरा ई -पिक पाहणी अथवा ई – पिक नोंदणी करणे आवश्यक आहे असे जाहीर सूचना करण्यात आली होती त्यासाठी अहमदपूर शेतकरी उत्पादक कंपनी लि. यांच्यावतीने वळसंगी या गावी कॅम्प ठेवण्यात आला होता यामध्ये शेतकऱ्यांना त्वरित जाग्यावरच पंतप्रधान सन्मान निधी तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक पाहणी अथवा नोंदणी करण्यास अडचण येत आहे अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदतीचे सहकार्य कंपनीच्या वतीने करण्यात आले या कॅम्पमध्ये कपिलेश्वर ढोले, विवेकानंद कोनाले, तुकाराम सुरनर, गणेश हाके ,योगेश पांचाळ, महेश लवराळे, रोहित, चेतन चीलकेवार, पत्रकार सादिक सर यांनी यासाठी परिश्रम घेतले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनातर्फे ई – पिक, के वाय सी करून घेण्याचे सांगण्यात आले.