मिया वाकी प्रकल्पा चा पहिला मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात आनंद घनवन अर्थात मिया विकी हा प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला. महात्मा फुले महाविद्यालय लातूर जिल्ह्यातील हा प्रकल्प राबविणारे पहिले महाविद्यालय ठरले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन काळाची गरज ओळखून आनंद घनवन हा मिया वाकी प्रकल्प महाविद्यालयात सुरू करण्यात आला आहे. यातून फुले महाविद्यालय हे विद्यापीठातल्या लातूर जिल्ह्यातील असलेल्या कॉलेजपैकी एकमेव ऑक्सिजन पार्क बनलेले कॉलेज असणार आहे.
यासाठी अभियंता सोमेश शिंदे, परमेश्वर पौळ, वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडचे संतोष मुगटकर, प्रीतम भराडिया, गणेश साखरे, सतीश कुलकर्णी, अजय सोनकांबळे या वृक्षप्रेमींचे व पर्यावरण जागृतीचा ध्यास घेऊन मोफत सेवा देणार-या वरील सर्व मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. या ‘मियावाकी’ प्रकल्प अंतर्गत प्रकल्पांतर्गत विविध प्रजातीचे ३१२ वृक्ष लावण्यात आले.
या यावेळी नॅक कोऑर्डिनेटर तथा उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ.अनिल मुंढे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. बी. के. मोरे, डॉ. डी. एन. माने, डॉ. पांडुरंग चिलगर, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. प्रकाश चौकटे, प्रा. अतिश आकडे, डॉ.प्रशांत बिरादार, डॉ. संतोष पाटील, प्रा. डी.जे. चव्हाण, प्रा. पी. एम. गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, वामन मलकापूरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.