विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी रुई- राळगा व नागझरी च्या नुतन संचालकांचा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या रुई- राळगा-वरवटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच अटीतटीची निवडणूक झाली त्यात माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या समर्थकांनी तेरा पैकी तेरा जागा बहूमताने जिंकल्या आहेत.सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तालुक्यातील नागझरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहात रुई-राळगा व नागझरी येथील आयोजित करण्यात आलेल्या सोसायटीच्या संचालकाच्या सत्कार प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील,जिवण कुमार मद्देवाड, माजी उपसभापती देविदास सुरनर, अँड.अमित रेड्डी, राजकुमार खंदाडे, गोविंदराव गिरी,संगम कुमदळे, अँड.अमोल इरले, संग्राम नरवटे ,असद शेख आदिंची उपस्थिती होती.
रुई- राळगा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक राजकुमार नरवटे, उत्तम आडे, चंद्रकांत राठोड,राम देवकते, सय्यद आजम, शिवाजी देवकते,शाम मुकनर, नागनाथ चेवले, सदाशिव वाघमारे, बालाजी चव्हाण, बाबाराव बैनवाड हे उपस्थित होते.तर नागझरी येथील सोसायटीचे संचालक, अंकुश इप्पर, मारोती इप्पर, सुशिल इप्पर, दिपक इप्पर, संग्राम इप्पर, उत्तम मुंडे,नाथराव आलापुरे, रघुनाथ इप्पर त्याचबरोबर उद्धव इप्पर, बाबुराव इप्पर, भास्कर इप्पर, रामकिशन सुर्यवंशी यांच्या सह रुई,राळगा,वरवटी, नागझरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.