दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सुमठाणा गावातील पोळा उत्साह साजरा करण्यात आला

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सुमठाणा गावातील पोळा उत्साह साजरा करण्यात आला

अहमदपूर (गोविंद काळे) : बैल पोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात.बैलपोळा २६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे.बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो.शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलावर अवलंबून आहे.त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करतात.या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजगाजत मिरवणूक काढली जाते.

बैलपोळा सण हा महाराष्ट्र सह अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो मात्र विविध राज्यात वेगवेगळ्या पध्दतीनुसार हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळळा काळ असतो. महाराष्ट्रातही पोळा साजरा करण्याच्या पध्दतीत बदल पाहवयास मिळतो.मात्र प्रामुख्याने श्रावण अमावास्येला हा सण साजरा करण्याच्यी परंपरा आहे. हीच परंपरा सुमठाणा गावातील नागरिक पाळतात.पोळा हा सण दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण वर्षातून एकदा साजरा केला जातो.या दिवस शेतकरी आपल्या बैलांना सजवून मारोती मंदिराला प्रदक्षिणा घालतात.बैलांना नैवेद्य चारवले जाते. सुमठाणा गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला.

About The Author