स्वयंभू निळकंठेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – आ. रमेशआप्पा कराड
लातूर (प्रतिनिधी) : असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लातूर तालुक्यातील मौजे निळकंठ येथील स्वयंभू निळकंठेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल आणि या परिसराचा सर्वांगिन विकास केला जाईल अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी श्रावण मास अनुष्ठान सांगता कार्यक्रमाच्या प्रसंगी दिली.
लातूर तालुक्यातील मौजे निळकंठ येथील स्वयंभू निळकंठेश्वर मंदिर परिसरात सोनपेठ मठाचे मठाधिपती श्री ष. ब. १०८ श्री. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे २१ वे श्रावणमास तपोनुष्ठान गेल्या २९ जुलै २०२२ पासून सुरू होते. या श्रावण अनुष्ठानाचा आज रविवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सांगता सोहळा शिवकीर्तनकार विश्वनाथ स्वामी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठया उत्साहाच्या आणि भक्तीपुर्ण वातावणात संपन्न झाला.
या सांगता सोहळयास भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी भेट दिली. यावेळी स्वंयभू निळकंठेश्वर मंदिरात भक्तीभावे महापूजा करून श्री ष. ब. १०८ श्री. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे शुभाशिर्वाद घेतले. त्याचबरोबर शिवाचार्य महाराजांचा यथोचित सत्कार केला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम वाघमारे, सुरज शिंदे, भैरवनाथ पिसाळ, अशोक सावंत, प्रताप पाटील, दिपक वांगस्कर, गोपाळ पाटील, रशीद पठाण, चंद्रकांत वांगस्कर, अरूण लांडगे, धनराज शिंदे, सुधाकर गवळी यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा स्वंयभू निळकंठेश्वर देवस्थान समिती, अनुष्ठान उत्सव समिती त्याचबरोबर निळकंठ, भिसे वाघोली, पिंपळगाव, भोसा, मसला, तांदूळजा, गाधवड, यासह विविध गावचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थिता समवेत चर्चा करताना आ. कराड म्हणाले की, निळकंठ येथील स्वंयभू निळकंठेश्वर देवस्थानाबाबत दिवसेंदिवस भावीक भक्तात मोठी श्रृध्दा वाढत आहे. यामुळे या परिसरात येणा-या भाविकांची संख्या वाढत असल्याने भाविक भक्तांच्या सोयीसाठी मंदिर परिसराचा सर्वांगीन विकास होणे गरजेचे आहे. सदरची गरज लक्षात घेवून येत्या काळात राज्यशासनाच्या माध्यमातून या निळकंठेश्वर मंदिर परिसराचा सर्वांगीन विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे बोलून दाखविले.
यावेळी निळकंठेश्वर देवस्थान समितीचे शिवदत्त औताडे, परमेश्वर पाटील, शिवाजी अंबेकर, ज्ञानेश्वर धुमाळ, व्यंकट धुमाळ, श्रीकृष्ण बुलबुले, काशिनाथ ढगे, बाबा महाराज, शंकर चव्हाण, समाधान कदम, सुनील भिसे, तात्यासाहेब औताडे, बाबा चव्हाण, प्रभू पाटील, शुभम खोसे, किशोर काटे, साहेबराव शिरसागर, अण्णासाहेब कदम, चंद्रकांत वांगस्कर, राजाराम पानढवळे, साहेबराव कदम, योगीराज साखरे, प्रफुल्ल गजभार, ईश्वर बुलबुले, महेश साखरे, गोपाळ सोट, नरसिंग माने, पांडूरंग औताडे, नामदेव शिंदे, पुंडलिक अंबेकर, ओम औताडे, राजाभाऊ जाधव, विनोद कदम, कामराज कदम, संजय वांगस्कर, बापूराव बिडवे, संभाजी लोखंडे, पंडित जाधव, श्रीकृष्ण भिसे, दत्ता भिसे, अविनाश कदम, मनोज भुजबळ, हनुमंत राजमाने, नागनाथ धुमाळ, नरसिंग वांगस्कर, गौरीशंकर धुमाळ, गोविंद भोसले, गोपाळ पवार नागनाथ कोदरे पुंडलिक सोड सिद्धेश्वर वांगस्कर, मधुकर बिडवे, अच्युत पिसाळ, अण्णासाहेब पाटील, बाबासाहेब भिसे, सत्यवान देशमुख, ज्ञानेश्वर वानखेडे, महेश साखरे, सिद्राम चव्हाण, बापू देवकर, राजाभाऊ पिसाळ, प्रशांत पिसाळ, तानाजी ढोबळे, प्रशांत सोट, गिरी महाराज, हनुमंत पवार यांच्यासह विविध गावातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.