आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत पानगाव येथील अनेक तरुणांचा भाजपात प्रवेश

आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत पानगाव येथील अनेक तरुणांचा भाजपात प्रवेश

लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्‍या पानगाव येथील अनेक तरुणांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. तरूणांच्‍या या प्रवेशामुळे भाजपाचा बालेकिल्‍ला असलेल्‍या पानगावात भाजपाला अधिकची बळकटी मिळालेली आहे.

या पक्षप्रवेश प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अँड. ज्ञानेश्वर चेवले, भाजपाचे लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, रेणापूर तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, लातूर तालूकाध्यक्ष बन्सी भिसे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, अमर चव्हाण, शीला आचार्य, महेंद्र गोडभरले, वीरेंद्र चव्हाण अँड. महादेव गुडे, अँड राजकुमार काबळे, संतोष तूरूप यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

पक्षप्रवेश प्रसंगी अनेक तरूणांनी पानगाव येथील स्‍थानिक राजकारण, इतर पक्षात झालेली गळचेपी आणि विकास कामाच्‍या अडीअडचणी याबाबत आपले मनोगत व्‍यक्‍त करून मोठया अपेक्षेने आणि विश्‍वासाने आम्‍ही भाजपात प्रवेश करीत असल्‍याचे बोलून दाखविले.

लोकनेते स्‍व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे पानगाव हे गाव सर्वात आवडते गाव होते. त्‍यामुळे पानगाव भाजपाचा बालेकिल्ला कायम राहीला आहे. ज्‍याप्रमाणे मुंडे साहेबांनी प्रत्‍येकाला जपण्‍याचे काम केले त्‍याच पध्‍दतीने जात, धम, पंथ असा भेदभाव न करता सर्वांना सोबत घेवून काम करीत आहे असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, प्रवेश केलेल्या सर्वांना भाजपात सन्मानाची वागणूक मिळेल कोणाचाही विश्वासघात होणार नाही त्याचबरोबर पानगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जातील अशी ग्वाही दिली.

भाजपात काम करणा-या सर्वांनी लोकाच्‍या विश्‍वासाला प्रामाणिकपणे उतरले पाहीजे, माणूस केंद्रबिंदू मानून त्‍याच्‍या अडीअडचणीची सोडवणूक करावी. येणा-या काळात होऊ घातलेल्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसह सर्वच निवडणूकीत सर्वांनी एकजूटीने, एक ताकतीने भाजपाच्‍या मताधिक्‍यात वाढ करावी आणि पानगाव हे गाव भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करावे असे आवाहन केले.

पानगाव येथील काँग्रेसचे तालुका सचिव प्रकाश गालफडे, शिवसेनेचे अँड किशोर श्रीगिरे, रमाकांत संपत्ते, शिवसेना शहर प्रमुख सुधाकर बोराडे, उपप्रमुख प्रतीक पद्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल कुरे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष भागवत गाडगीळे, ईश्वर भंडारे, गोविंद गोमारे, धर्मराज संपत्ते, गणेश गोरे नितीन कांबळे, रवी मोहिते, संदीप गुडे, परमेश्वर बरुळे, माऊली संपत्ते, गणेश तुरुप, संतोष गालफाडे रमेश कुरे चंद्रकांत पेद्दे, आशिष पेद्दे, अवधूत चव्हाण, जयराम जाधव, आनंद काकडे, ऋषिकेश वाघमारे, भरत कांबळे, विकास गालफाडे, रमेश कुंभारे, गणेश माने, नवनाथ शेरखाने, अश्रफ शेख, जनार्दन बघीने, राहुल कलशेट्टी, अविनाश कुरे, खालील शेख, नरेश गडगीळे, शिवशंकर कलशेट्टी, रवी दीक्षित, शंकर माने यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला

About The Author