वर्ग खोलीत शिक्षकाचा फोटो लावण्याच्या उपक्रमावर शिक्षक समिती निलंगा यांच्या वतीने बहिष्कार

वर्ग खोलीत शिक्षकाचा फोटो लावण्याच्या उपक्रमावर शिक्षक समिती निलंगा यांच्या वतीने बहिष्कार

निलंगा (प्रतिनिधी) : आपली गुरुजी अंतर्गत जि पच्या शाळेतील सर्व वर्गात शिक्षकांनी स्वतःचा फोटो लावण्याच्या उपद्रवी उपक्रमावर बहिष्कार टाकण्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आवाहन करण्यात आले होते तसेच ग्रामीण भागात सेवार्थ जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्या मुख्यालयाच्या संबंधाने घरभाडे भत्ता थांबण्यासह कारवाई करा अशा प्रकारची मागणी मा. आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. शिक्षकांबद्दल असणारा कमालीचा आकस मा. आमदार बंब साहेबांच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून, सभांमधून दिसून येत आहे. ग्रामीण भागात कार्य शिक्षकांच्या वास्तव अडचणीचा आणि गुणवत्ता संवर्धनाच्या आड येणाऱ्या शासनाच्या धोरणाचा कुठलाही सांगोपांग विचार न करता शिक्षकांचा उपमर्द मा. आमदार बम साहेबांकडून वारंवार होत आहे. सोमवारी दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सर्व शिक्षक बांधवांनी काळी फीत लावून मा. आमदार प्रशांत बंब साहेबांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

(२) “आपले गुरुजी” उपक्रमांतर्गत वर्गात शिक्षकांनी स्वतःचा फोटो लावण्याच्या उपद्रवी उपक्रमावर बहिष्कार टाकण्याचे सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आवाहन करण्यात येत आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेतील क्षेत्रिय अधिकारी प्रत्येक शाळेत किती शिक्षकांनी आपले फोटो लावले याचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी प्रत्येक शिक्षकाने मी फोटो लावणार नाही असा दृढ संकल्प करून हा उपद्रवी उपक्रम हाणून पाडणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी हे आवाहन करण्यात आले. अर्थहीन, अनाकलनीय आणि अतार्किक असा हा “आपले गुरुजी” फोटो लावण्याचा गैरवाजवी उपक्रम आहे. गावागावात हा चेष्टेचा विषय होणार आहे.

वरील दोन्ही प्रकारे संबंधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक शिक्षक समिती शाखा निलंगा च्या वतीने तालुक्यातील जि प शाळेतील शिक्षकांना काळी फीत लावून जाहीर निषेध नोंदवावा असे आवाहन केले होते त्या वाहनास तालुक्यातून भरपूर प्रतिसाद मिळाला बहुतांश शाळेतील शिक्षक बांधवांनी काळी फीत बांधून दिवसभर शैक्षणिक कार्य केले यात विशेष महिला शिक्षक भगिनी ही भाग घेतला या निषेध आंदोलनात सहभागी शाळेचे व शिक्षकाचे आभार शिक्षक समितीचे कार्यकर्ते तसेच चेअरमन अरुण सोळुंके तालुकाध्यक्ष संजय कदम शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मांडले.

About The Author