मनोज भाऊ चिखले यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांच्या चबुतऱ्यासाठी दहा हजार

मनोज भाऊ चिखले यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांच्या चबुतऱ्यासाठी दहा हजार

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे बेलसकरगा येथील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून आलेले, उदगीर पंचायत समितीचे माजी सदस्य तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मनोज भाऊ चिखले यांनी बेलसकरगा येथे अण्णाभाऊ साठे यांचा चबुतरा उभारण्यासाठी दहा हजार रुपयाची मदत दिली. मनोज भाऊ चिखले यांनी दिलेल्या या अर्थसहाय्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे जाहीर आभार मानले. पुढील जयंतीच्या वेळी किमान चबुतरा पूर्ण होईल. अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

About The Author

error: Content is protected !!