आवलकोंडा घाटात जीवघेणी खड्डा -आवलकोंडा-जळकोट मार्गाची वाहतूक बंद ; गाढव मोर्चा काढण्याचा इशारा
उदगीर (प्रतिनिधी) : मागील सतत ३३ दिवसात पडलेल्या पावसाने उदगीर-आवलकोंडा-अतनूर-बारहाळी-जळकोट, उदगीर-अतनूर-मांजरी-देवूळवाडी-रामपूर-शिवाजीनगर-गव्हाण-बाराहाळ्ळी, आवलकोंडा, जळकोट-रावणकोळा-हळदवाढवणा-अतनूर-उदगीर, देवूळवाडी, मेवापूर, मरसांगवी, गुत्ती, देवूळवाडी-घोणसी-अतनूर-मांजरी-आवलकोंडा-जळकोट मार्गाची दि.५ आॕगस्ट पासूनच सुरु रोजी झालेल्या अतिवृष्टी पावसाने आवलकोंडा घाटातील रस्ता असुरक्षित झाला आहे.
उदगीर-अतनूर आंतरी मार्गाची वाहतूक म्हणून राज्य परिवहन महामंडळाने दि.१० आॕगस्ट पासून या मार्गावरच्या बस कायम बंद केलेल्या आहेत. उदगीर–मांजरी-देवूळवाडी-रामपूर-शिवाजीनगर-गव्हाण-बाराहाळ्ळी, उदगीर-आवलकोंडा-अतनूर-बारहाळी-जळकोट येणाऱ्या बसेस संपुर्णत: बंद आहेत. प्रवाशांचे हाल होत आहेत. उदगीर-आवलकोंडा घाटात पावसाने रस्ता खचून जाऊन भयंकर खोल खड्डा पडला आहे.
हा खड्डा दोन वर्षांपासून लहान होता. याकडे मतदारसंघाचे माजी गृहराज्यमंत्री, सार्वजनिक माजी राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी डोळयावर पट्टी, कानात बोटे ठेवून स्पशेल जाणूनबुजून काणाडोळा करित आहेत. हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करून पक्के दगडी बांधकाम करावे, याकडे कोणाचे गार्भीर्याने लक्ष देत नाहीत. मोठा अपघात झाल्याशिवाय बांधकाम विभागास मात्र जाग येणार नाही. याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय उदगीर, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालय उदगीर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद लातूर कार्यालयावर निषेर्धात गाढव मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उदगीर तालुकाअध्यक्ष व्यंकटराव पाटील आवलकोंडेकर, एस.जी.शिंदे , चंद्रशेखर पाटील, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार काँग्रेसच्या उदगीर तालुकाअध्यक्ष सौ.मायादेवी बिरादार-मुंडकर-पाटील, उपसरपंच बाबूराव कापसे, ग्रा.प.सदस्य प्रमोद संगेवार, विठ्ठल बारसुळे, राहुल गायकवाड, गणेश गायकवाड, व्यंकटराव मुंडकर-पाटील आवलकोंडेकर सह आवलकोंडा प्रवाशी महासंघ, ग्रामस्थांनी दिला आहे.