भारतीय अन्न महामंडळाच्या सदस्यपदी किशनराव धुळशेट्टे यांची निवड
उदगीर (एल.पी. उगिले) : लातूर जिल्ह्यातील भाजपाचे जेष्ठ नेते, जळकोट नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष किशनराव धुळशेट्टे यांची भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना तसे, केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार कडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य नेत्याची केंद्रीय पातळीवरील महत्वाच्या मानल्या जात असलेल्या महामंडळावर निवड झाली असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
किशनराव धुळशेट्टे एका सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील व्यक्तीमत्व आहेत. जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा देत त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता. जळकोट तालूक्यातील भाजपाचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. त्याचेच फळ धुळशेट्टे यांना मिळाले असून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भारतीय अन्न महामंडळावर त्यांना स्थान देण्यात आले आहे. यापुर्वी, त्यांनी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश पातळीवर चांगली कामगिरी केली होती. तेंव्हाच त्यांनी पक्षश्रेष्ठीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. अखेर, भाजपा पक्षश्रेष्ठीने त्यांच्यातील प्रामाणिकतेला व कार्यकुशलतेला न्याय दिला असून सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
पत्रकार परिषद आयोजित करुन सदरिल माहीती धुळशट्टे यांनी मध्यमासमोर ठेवली. त्यानंतर जळकोट भाजपाच्या वतीने किशनराव धुळशेट्टे यांचा मोठया उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात, मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे मत व्यक्त केले. आणि मिळालेल्या जबाबदारीतून महाराष्ट्रातील तळागाळातील नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे. याप्रसंगी, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री पियुश गोयल, केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, केंद्रीय राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे, केंद्रीय राज्यमंत्री सी आर चौधरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, खासदार सुधाकर श्रंगारे, आ.सुरेश धस, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, सोमेश्वर सोप्पा, अरविंद नागरगोजे आदींचे आभार मानले.
यावेळी, सर्व पत्रकार, भाजपाचे नेते बालाजी केंद्रे, अरविंद नागरगोजे, व्यंकटराव तेलंग,चेअरमन उमाकांत डांगे, दत्ता धुळशेट्टे, रमेश देशमुख, माधव मठदेवरु, विश्वनाथ चाटे, दत्ता वंजे, बालाजी तिडके, बाबूराव गुट्टे, रत्नाकर केंद्रे, बालाजी थोंटे, रामदास, खटके, गणपत तिलमिलदार,हनमंत डांगे, दत्ता शेळके, काशिनाथ बोधले, फकरू मोमीन,हिदायतूल्ला तांबोळी, सोमेश्वर मठदेवरु, व्यंकट पवार, खलील मोमीन, मलिकार्जून देशमुख, बालाजी धुळशेट्टे, शंकरअण्णा धुळशेट्टे, मलिकार्जुन गुड्डा, सत्यवान पांडे, बालाजी मालूसुरे, सुर्यकांत पांचाळ, सागर कोटगीरे, रावसाहेब आगलावे, वैजनाथ केंद्रे, संभाजी गायकवाड, राजेंद्र गायकवाड, बिस्मिल्ला बेग, नामवाड, तोगरे, यांच्यासह अनेक जेष्ठ नेते, पदाधीकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.